ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

साखर

सोनई – साखर कामगारांचे प्रलंबित प्रश्न विविध सोयी सुविधा.नवीन वेतन मंडळ त्वरित लागू करण्यासाठी.राज्य सरकारने त्रिपक्ष समितीची स्थापना तातडीने केली पाहिजे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी केले.मंगळवार दिनांक २ जूलै रोजी शनिशिंगणापूर येथे झालेल्या साखर कामगारांचे मेळाव्यात काळे बोलत होते. व्यासपीठावर साखर कामगार जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष काॅ. आनंदराव वायकर,खजिनदार अशोक पवार, सल्लागार अविनाश आपटे, प्रतिनिधी मंडळाचे खजिनदार प्रदीप बनगे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना तात्यासाहेब काळे म्हणाले साखर कामगारांच्या प्रश्नांचा अभ्यास करून नवीन मागण्यांचे निवेदन सरकारला दिलेले आहे. येत्या दोन महिन्यांत आपण जिल्हा व विभाग निहाय बैठका घेऊन. आपल्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधून घेऊ. यासाठी साखर कामगारांनी संघटित होऊन एकत्र आल्यास प्रश्न सुटतील. त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा राज्य संघटनेची ताकद तुमच्या पाठीशी राहिल असे त्यांनी स्पष्ट केले.

साखर

यावेळी ज्ञानदेव आहेर (प्रवरा), विलास वैद्य (अगस्ती),अनिल गुणवरे (श्रीगोंदा),बाळकृष्ण पुरोहित (भेंडा),सचिन काळे (राहुरी), नितीन गुरसळ (कोळपेवाडी), शिवाजी औटी (पारनेर), शंकरराव भोसले – प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस (सांगली), राऊ पाटील – प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष (कोल्हापूर), काॅ.आनंदराव वायकर (अहमदनगर) आदिंनी आपल्या मनोगतातून साखर कामगारांच्या व्यथा मांडल्या. तसेच सेवानिवृत्ती वेतन वाढवणे, नवीन वेतन मंडळ लागू करणे,नवीन कामगार कायद्याने कामगारांचे हक्क मोडीत निघतील. त्यामुळे या कायद्याला साखर कामगारांचा विरोध, तसेच प्रत्येक कारखान्याचे स्थानिक समस्या यावर चर्चा झाली.

उपस्थित मान्यवरांचा सत्कार मुळा कारखाना साखर कामगार युनियन सोनई व शनैश्वर देवस्थानच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमास मुळाचे आदिनाथ शेटे , सुभाष सोनवणे,कारभारी लोडे, योगेश भगत , गोविंद कोंगे ,पी.आर.मोरे ज्ञानेश्वरचे अशोक आरगडे, दत्तात्रय पवार, भगवान चावरे,वृध्देश्वरचे शेषनारायण म्हस्के,एकनाथ जगताप, अगस्तीचे शिवाजी कोठवळ, अशोक नगरचे रवींद्र तांबे,कोळपेवाडीचे प्रकाश आवारे, श्रीगोंदाचे नंदकुमार गवळी, प्रवराचे आण्णासाहेब अनाप आदिंसह जिल्ह्यातील इतर साखर कारखान्याचे ८९ प्रतिनिधी हजर होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा समन्वय समितीचे सरचिटणीस डी.एम. निमसे यांनी केले. उपस्थितांचे आभार अर्जुनराव दुशींग (राहुरी) यांनी मानले.

साखर
साखर
साखर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

साखर
साखर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

साखर