ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गहिनीनाथ महाराज

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे असलेले जागृत देवस्थान म्हणून सर्व परिसरात असणाऱ्या श्री क्षेत्र गहिनीनाथ महाराजांच्या यात्रेस आज गुरुवार पासून प्रारंभ होत आहे.अक्षय तुर्तीयच्या झाल्या नंतर येणाऱ्या शुक्रवारी प्रमुख यात्रा भरते.जवळपास तीन दिवस चालणारी यात्रा महोत्सवाचा परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे यात्रा कमिटी व पाचेगाव ग्रामस्थांनी आवाहन केले आहे.


यावेळी गावातील मोठ्या संख्येने आज गुरुवारी १६ मे रोजी तरुण भाविकांनी प्रवरासंगम येथून कावडीने आणलेल्या गंगेच्या जल सवाद्य मिरवणूक होऊन श्री क्षेत्र गहिनीनाथ महाराजांचा जलाभिषेक करून गावातील सर्व देवतांना गंगाजल अर्पण करणारा त्या सायंकाळी ६ वा.कावडी, काठी व संदल मिरवणूक, त्यानंतर सालाबादप्रमाणे यावर्षी शुक्रवार दि. १७मे २०२४ रोजी श्री गहिनीनाथ महाराज यांच्या यात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे.

गहिनीनाथ महाराज


शुक्रवार दि. १७ मे रोजी रात्री ९.०० वा.मुख्य यात्रोत्सव, छबीना मिरवणूक रात्री १२ वा. शोभेची दारूची आतिषबाजी,शनिवार दि.१८ मे रोजी सायं. ८.३० वा. हिऱ्याची हिरकणी हिंदवी पाटील लावणीचा कार्यक्रम,रविवार दि. १९ मे दुपारी ११ ते ६ वाजेपर्यंत घोडा-बैल शर्यत शमीगोंडा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम या यात्रेत होणार असून तरी सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रा महोत्सवाचा आनंद घ्यावा, हि विनंती यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी केली आहे.

गहिनीनाथ महाराज
गहिनीनाथ महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गहिनीनाथ महाराज
गहिनीनाथ महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गहिनीनाथ महाराज
Share the Post:
error: Content is protected !!