ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

देविदास

नेवासा – नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिराचें सेवेकरी महाराज म्हणून देविदास महाराज म्हस्के यांची निवड करण्यात आली असून ते १८ जून रोजी श्रीक्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पदग्रहण करणार आहेत. यापूर्वी या पदावर शिवाजी महाराज देशमुख काम पाहत होते. देविदास महाराज म्हस्के हे सध्या श्रीक्षेत्र हिंगणगाव (ता. शेवगाव) येथील अडबंगीनाथ संस्थान येथे कार्यरत असून सद्‌गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे माजी विद्यार्थी आहेत.

१८. जून रोजी विठ्ठल आश्रम गंगापूर येथील रामभाऊ महाराज राऊत, ज्ञानाई आश्रमाच्या मिराबाई महाराज मिरीकर व संत नारायणगिरी महाराज प्रतिष्ठानचे उद्धव महाराज नेवासेकर यांच्या उपस्थितीत ते मंदिराची जबाबदारी स्विकारतील. यावेळी आमदार शंकरराव गडाख व माजी आमदार नरेंद्र पाटील घुले हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती देवस्थानच्यावतीने देण्यात आली.

newasa news online
देविदास

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

देविदास
देविदास

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

देविदास
error: Content is protected !!