ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

काँग्रेस

नेवासा – तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीची मीटिंग मार्केट कमिटी सभागृहात उत्साही वातावरणात संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब पठारे होते.याप्रसंगी बोलताना प्रदेश अल्पसंख्यांक उपाध्यक्ष अभिजीत लुनिया यांनी मिटींगचा उद्देश विशद करताना सांगितले की लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे.तसेच माननीय राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनचा ठराव त्यांनी मांडला. सर्वानुमते टाळ्याच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले.श्रीमती शोभा पाचारे यांनी सांगितले की लोकसभा यशाला आपण हुरळून न जाता विधानसभेमध्ये चांगली कामगिरी केली पाहिजे.

काँग्रेस

चंद्रशेखर कडू म्हणाले की प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 288 जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे काँग्रेस पक्षात विशेषता तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असे वातावरण आहे.वसंतराव रोटे, बाळासाहेब झावरे, संदीप मोटे, ॲड.पांडुरंग माकोने, युवक कार्यकर्ते द्वारकानाथ जाधव, शहर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष अंजू भाई पटेल तालुक्यातून वर्किंग कमिटीचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.माजी कुलगुरू व कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांनी काँग्रेसच्या विचारधारा, सर्वधर्मसमभाव आणि तात्विक मूल्यांचा उहापोह करताना सांगितले की काँग्रेसने देशासाठी भाकरी हरितक्रांती द्वारे पाणी मोठ्या धरणाद्वारे, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान या विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली असल्याचे सांगितले.

काँग्रेस

येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यास काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री होईल असा ठाम विश्वास डॉ.ढगे यांनी व्यक्त केला.नेवासा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा असा ठराव मीटिंगमध्ये सर्वानुमते घेण्यात आला. तसेच कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांचा एकमेव इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज विचारात असल्यामुळे मीटिंगमध्ये त्यांना सर्वांनी एकमुखी पाठिंबा देऊन योग्य उमेदवार असल्यची बाधक चर्चा झाली. अण्णासाहेब पठारे यांनी मोठ्या संख्येने वर्किंग कमिटीचे सदस्य उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.वसंतराव रोटे यांनी आभार मानले.तर पक्षासाठी सर्वांनी तन-मन-धनाने काम करावे असे त्यांनी आवाहन केले.

newasa news online
काँग्रेस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

काँग्रेस
काँग्रेस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

काँग्रेस
error: Content is protected !!