ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

विमा

नेवासा – शासनाने विमा कंपन्यांची घरे भरण्यासाठीच पिक विमा योजना सुरू केली असल्याचे आरोप करीत शेतकरी संघटना राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित काळे यांनी अधिकारी आणि विमा कंपनीचे संगणमताने नेवासा तालुक्यात सुमारे 150 कोटी रुपयांचा गैरप्रकार झाल्याचे आरोप केले आहेत

नेवासा तालुक्यामध्येच नव्हे तर राज्यात पिक विमा ही गंभीर समस्या झाली आहे प्रशासनाचा गैरकारभार व हात मिळवणे यामुळे शेतकरी तसेच शासनाचा सुद्धा मोठा तोटा होत असल्याचे अजित काळे यांनी सांगितले राज्यात सर्व शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत त्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाने अनुदान रूपाने पैसे भरायचे असतात परंतु राज्य शासनाने अद्याप पैसे भरले नसल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे शासनाने नोटिफिकेशन उशिरा काढण्याचे सुद्धा विमा कंपन्यांकडून सांगण्यात येत असल्याने विमा मिळण्यास अनंत अडचणी येत आहेत.

विमा

या सर्व बाबतीत शेतकरी संघटनेने विमा कंपन्यांवर व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली परंतु या मागणीवर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही शेतकरी विमा कंपन्यांसाठी हप्ते भरत असताना सर्व काही सुरळीत असते त्यावेळी कोणतीही साईट हँग होत नाही सुरळीतपणे पैसे गोळा केले जातात पण नंतर ज्यावेळी क्लेम करायचं त्यावेळी ऑफलाईन ला सुद्धा प्रॉब्लेम असतो टोल फ्री नंबर उचलला जात नाही क्लेम करण्यासाठी 72 तासाची अट घातली जाते असे वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना अडचणीत आणले जाते.

नगर जिल्ह्यात आतापर्यंत शेतकरी संघटनेने चार याचिका दाखल केला असून नेवासासाठी सुद्धा लवकरच याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे अजित काळे यांनी स्पष्ट केले
पीक विमा विषय पुढे बोलताना ते म्हणाले की तालुक्यातील 59 हजार शेतकऱ्यांनी विमा उतरला होता पैकी 30 हजार शेतकऱ्यांचे क्लेम झाले आहेत व सुमारे 114 कोटी विमा कंपन्यांकडे थकलेले आहेत
दूधच्या आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की देशात सर्वात कमी भाव महाराष्ट्रात आहे शासनाने 34 रुपयाचे भाव स्वतःच पंचवीस वर आणले आणि आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 30 रुपये करीत आहे शासनाच्या अनुदानावर आता शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही त्यामुळे दूध व्यवसाय बाबतीत एम एस पी चा कायदा करावा अशी शेतकरी संघटनेची माहिती मागणी आहे.

विमा

याशिवाय दुधाला 40 रुपये भाव द्यावा, दुधाला हमीभाव द्यावा व दुधाच्या व्यवसायातील भेसळच्या प्रश्नाला शासनाने भेसळ प्रतिबंधक कायदा करावा या मागण्यासाठी यापुढील काळात आंदोलने करणार असल्याचे त्यांनी सांगितले

या पत्रकार परिषदेला हरिअप्पा तुवरउपजिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना,डॉ रोहीत कुलकर्णीयुवाध्यक्ष शेतकरी संघटना,बाबासाहेब नागोडे तालुका उपाध्यक्ष शेतकरी संघटना,अॅड बाळासाहेब कावळे,किरण लंघे,कैलास पवार,मेजर अशोक काळे दत्तात्रय निकम आधी पदाधिकारी हजर होते.

newasa news online
विमा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विमा
विमा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विमा

I

error: Content is protected !!