ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रिक्षा

नेवासा फाटा – नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेमार्फत आज निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये संघटनेतर्फे अनेक मागण्या मांडण्यात आल्या. परवाना धारक ऑटो रिक्षा फिटनेस फी 50 रुपये रोज दंड रद्द करा , महाराष्ट्रातील परवानाधारक आटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याचे कामकाज लवकरात लवकर चालू करावे , महाराष्ट्र सरकारने ऑटो रिक्षांच्या मुक्त परवाना धोरण बंद करावे, अहमदनगर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये ऑटो रिक्षा चालकांचे व मालकांचे रिक्षा पासिंग चे कामकाज व इतर कामासाठी आरटीओ ऑफिस मध्ये मदतीस नेमून त्यांचे कामे करण्यासाठी मदत करावी. या मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

निवेदन देतेवेळी अध्यक्ष श्रीपतराव दारुंटे, उपाध्यक्ष सचिन नागपुरे ,मोहन जाधव, योगेश काळे ,मुन्ना पठाण ,किरण अवसरमल, गंगाराम नवसे कुंडलिक लष्करे ,रमेश गायकवाड ,रवी बंदिवान, श्रीनिवास डहाळे ,गंगाधर दगडे ,बाळासाहेब निकम ,किरण डाके, कैलास धारकर ,प्रमोद काळे ,निलेश दारुंटे ,इकबाल सय्यद ,प्रमोद काळे ,संजय पोकळे भारत वालतुरे अंकुश मस्के ,बाबासाहेब दगडे ,दिनेश लष्करे ,सलमान शेख ,आरिफ पठाण ,भाऊसाहेब डाके, शकील जागीरदार युसुफ इनामदार, गणि मंसूरी यासह आदींच्या निवेदनावर सह्या आहेत याप्रसंगी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचे या ठिकाणी सांगण्यात आले.

रिक्षा
रिक्षा
रिक्षा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रिक्षा
रिक्षा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रिक्षा