ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मुरकुटे

नेवासा – १९७५ ला देशभरात विनाकारण आणीबाणी लावून हजारो देशभक्तनां तुरुंगात डांबण्यात आले लोकशाही मुल्य रक्षणासाठी यातना भोगलेल्या लोकतंत्र सेनानींचे कार्य गौरवास्पद व युवकांना प्रेरणा देणारे आसल्याचे प्रतिपादन नेवासा विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. नेवासे येथील नाशिक कारागृहात आठरा महिने कारावास भोगलेल्या मिसाबंदी व वारसदारांच्या सन्मान सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते भाजप तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी सर्वांचे स्वागत केले.

मुरकुटे

जून १९७५ च्या कालखंडातील स्मृतिने आजही अंगावर शहारे येतात, या काळात मिसाबंदिना यम यातना भोगाव्या लागल्या, अनेकांचा छळ करून प्रपंच उध्वस्त करण्यात आले, वृत्त पत्र कचेऱ्यावर बंधने आणून लिखाण, भाषण स्वातंत्र्यावर बंदी घातली जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा गळा घोटून लोकशाहीला कलंक लावणारा प्रकार केवळ सत्तेला चिटकून राहाण्यासाठीच तत्कालीन इंदिरा गांधी सरकारकडून केल्याचे भाजप चे जेष्ठ नेते व मिसाबंदि दिनकरराव ताके पाटील यांनी कटू आठवणीनां वाट मोकळी करून देताना केले

मुरकुटे

नाशिक कारागृहात त्यावेळी राज्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जेष्ठ नेत्यांसह स्व. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक समाजवादी अन्य चळवळीतील नेत्यांचा सहवास लाभला विचारांची देवाणघेवाण झाल्याचे ताके यांनी आठवणीत सांगितले सुरेशराव नळकांडे, मोहनराव खराडकर, या मिसाबंदीसह वारसदार सौ. शारदा गणेश जोशी, शाम माधवराव मापारी, दीपक बबनराव शिंदे, राजेंद्र त्रिंबक महाजन यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. भाजप तालुका विस्तारक अजीत पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. अशोक ताके यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

newasa news online
मुरकुटे
मुरकुटे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मुरकुटे
मुरकुटे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मुरकुटे