ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बिबट्या

राहुरी – राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथे दत्तात्रय कारभारी लांबे व किशोर दशरथ मोरे हे आपल्या कुटूंबाच्या उपजिविकेसाठी शेळीपालन व्यवसाय करत आहेत .त्याचबरोबर गावातील अनेक शेतकरी ही काही प्रमाणात शेळी पालन हा व्यवसाय करत आहेत परंतु अनेक दिवसापासून पिंप्री अवघड परिसरात वास्तव्यास असलेल्या बिबट्याने या शेतकऱ्यांची झोप उडवली आहे .शुक्रवारी रात्री ठीक 02:00 वाजता या बिबट्याने दत्तात्रय कारभारी लांबे व किशोर मोरे यांच्या शेळ्यांच्या गोठ्यावर हल्ला करून दोन शेळ्यांना ठार केले असून एक शेळी जखमी झाली आहे .

बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे गोठ्यातील इतर जनावरेही भेदरून गेल्याचे या ठिकाणी निदर्शनास आले आहे तसेच आसपासच्या शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे .सदर घटनेची हकीकत वनविभागातील अधिकारी गोरक्षनाथ मोरे व पवन निकम यांना कळवताच त्यांनी तात्काळ दखल घेत घटनेच्या ठिकाणी पाहणी करून पंचनामा केला आहे .तसेच आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे .

यावेळी येथे जमलेल्या शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना पिंजरा लावण्याची मागणी केली आहे . गेल्या अनेक दिवसापासून वास्तव्यास असलेल्या बिबट्याने पिंप्री अवघड येथील वाड्यास्त्यांवरील अनेक शेळ्या व पाळीव कुत्र्यांवर हल्ला चढवून त्यांची शिकार केली आहे .कामावरून सायंकाळी घरी जाणाऱ्या अनेकांना या बिबट्याने रस्त्यातच दर्शन दिल्याने जीव मुठीत धरून घरी जावे लागत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे .शेतात काम करत असताना घरी असणाऱ्या लहान मुलांनाही या बिबट्यांचा धोका असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असल्याचे निदर्शनास येत आहे .या परिसरातील बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे .

बिबट्या

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बिबट्या
बिबट्या

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बिबट्या
error: Content is protected !!