ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वीज

नेवासा : शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असल्याने डी. पी. ट्रान्सफॉर्मर संख्या वाढवण्यात येऊन शहराचा वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील मापारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शहरात दोन दिवसापूर्वी थोड्याशा प्रमाणात वारे व पाऊस झाला तरी यामुळे शहरातील विज पुरवठा दोन दिवसापासून खंडित झाला होता. नागरिकांना रखरखात्या उन्हात कासावीस व्हावे लागले. त्यामुळे मोठा त्रास ही सहन करावा लागला. विज पुरवठ्यात अनियमितता असल्याने, व्होल्टेज प्रॉब्लेम ही सुरू झाला आहे.

वीज

उन्हाळ्याचे दिवस असून बऱ्याच घरात वृध्द पेशंट तसेच लहान मुले यांचा जीव कासावीस होत आहे. तर विज पुरवठ्याच्या अनियमिततेमुळे शासकीय कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प होत आहे. तसेच शहराची लोकसंख्या विचारात घेता डी. पी. ट्रान्सफॉर्मर ची संख्या कमी आहे. वापरकर्ते जास्त असल्यामुळे डी. पी. वर लोड येत आहे. त्यामुळे वारंवार लाईट जाणे, डिम होणे असे प्रकार होत आहेत. डी. पी. ट्रान्सफॉर्मर ची संख्याही वाढवण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

newasa news online
वीज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वीज
वीज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वीज
error: Content is protected !!