ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

योग दिन

नेवासा – श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी योगासने करत योग दिन साजरा केला. सर्वप्रथम विद्यालयाचे प्रा.डॉ.राजेंद्र गवळी यांनी योगगुरु ॲड श्री.अजय रिंधे व योगशिक्षक प्रा.नानासाहेब खराडे यांचे स्वागत केले. प्रा.खराडे यांनी आजच्या धावपळीच्या युगात योगाचे महत्व, गरज व विविध रोगापासून दूर राहायचे तर योगाशिवाय पर्याय नाही, याविषयी मोलाचे मार्गदर्शन करत वज्रासन, मयुरासन, सिंहासन, व कपालभाती असे विविध योग प्रकार विद्यार्थ्याकडून करून घेत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी योगासने करत जागतिक योग दिन अतिशय उत्साहात साजरा केला.

योग दिन

सदर उपक्रमाचे शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्रजी घुले पाटील, मा.आ.चंद्रशेखरजी घुले पाटील, मा.सौ.राजश्रीताई घुले पाटील, मा.डॉ.क्षितीज घुले पाटील, विश्वस्त मा.आ. पांडुरंगजी अभंग साहेब, अड देसाई देशमुख, सचिव श्री. अनिल शेवाळे, श्री.रविद्र मोटे, प्रशासकिय अधिकारी प्रा.भारत वाबळे, प्रा.डॉ.राजेंद्र गवळी, उपप्राचार्य दिपक राऊत, सर्व शिक्षकवृंद, पालक व इतर सर्व मान्यवरांनी कौतुक केले आहे.

newasa news online
योग दिन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

योग दिन
योग दिन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

योग दिन
error: Content is protected !!