ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पोलीस

सोनई – नवरा बायकोच्या वादात मुलीचा ताबा कुणाकडे देण्याच्या कारणावरून दि. ११ रोजी सोनई पोलीस स्टेशन येथे नवरा बायकोच्या वादावरून व मुलींच्या ताबा कुणाकड द्यायचा या कारणावरून नातेवाईकांचा आप आपसात वाद झाला. शिवीगाळ भांडणे होऊन पोलीस स्टेशनच्या समोरील मोकळ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपापसामध्ये झोंबाझोंबी व शिवीगाळ करून सार्वजनिक शांततेचा भंग केला.

पओ. काॅ. महेंद्र पवार यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून निलेश ज्ञानेश्वर घुले वय ३६, संतोष शिवाजी मोडवे वय ३६ दोघेही राहणार ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे, गोरख निवृत्ती खामकर वय ४० राहणार श्रीरामपूर, उज्वला संतोष कुमठेकर वय ३० राहणार वाघ वस्ती सोनई, सीताबाई दिलीप मेहलडा वय ५० राहणार ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे, संतोष जगन्नाथ कुमठेकर वय ३६ राहणार वाघ वस्ती सोनई, गोरक्षनाथ जनार्धन कुमठेकर वय ३४ रा सदर रुक्मिणीबाई जनार्दन कुमठेकर वर 60रा सदर वरील लोका विरुद्ध सोन‌ई पोलीस ठाण्यात गु. र. न. १७१/२०२४ भा. द. वी. १६० महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५/१ महाराष्ट्र पोलीस कायदा ११०/११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल लबडे करीत आहेत.

पोलीस
पोलीस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस
Share the Post:
error: Content is protected !!