ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime News : नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील गावा लगत असणारा पाथर्डी कॅनॉल मध्ये माणसाच्या मृतदेहाचे ५ ते ६ तुकडे आढळले असून परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली आहे. ही माहिती कळताच नेवासा कुकाना पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक किरण पवार व संतोष खंडागळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पाहणी केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा मृतदेह 20 ते २५ दिवसाचा असावा. त्यामुळे मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. नेमका कुणाचा आहे याचे तपासणी करणार आहोत.

Crime News

मृतदेहाचे मिळालेले तुकडे उत्तरीय तपासणी करिता पाठवण्यात येणार असून त्यानंतरच तपासाला सोपे जाईल. हा मृतदेह पुरुष किंवा स्त्रीचा आहे हे नंतरच कळेल. या गंभीर घटनेमुळे देडगाव परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्या की घातपात काय असावे ही परिसरातील नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

Crime News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime News
Crime News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime News
error: Content is protected !!