ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वाळू

नेवासा –तालुक्यातील जैनपुर गावाशेजारुन गोदावरी नदी गेलेली आहे.सदर नदीमधुन अवैध वाळु उपसा बंद होण्याबाबतचा ठराव आमच्या ग्रामपंचायतीच्या ग्राम सभेमध्ये मंजुर झालेला आहे.तरी सुध्दा नेवासा येथील कृष्णा परदेशी व इतर त्याच्या साथीदार हे अवैध वाळु उपसा करत असताना त्यांना जैनपुरच्या सरपंच शैला किशोर शिरसाठ व ग्रामस्थांनी वेळोवेळी वाळु उपसा करु नका आमचे गावातील पाण्याची पातळी खुप खालवत चाललेली आहे.याबाबत समज दिली होती.


दिनांक २५/०५/२०२४/ रोजी सकाळी ०९.३०. वा. चे सुमारास कृष्णा परदेशी व त्याचे साथीदार हे गोदावरी नदीपात्रातुन अवैध रित्या वाळु उपसा करुन ती त्यांचे कडील ४ ढंपर व २ टॅक्टरमधुन घेवुन जात असताना माझे पती किशोर शिवाजी शिरसाठ यांनी गावातील लक्ष्मीमाता मंदिरासमोर सदरची अवैध वाळू उपसा होवुन चाललेली वाहणे अडवीली.त्यावेळी माझे पती किशोर शिरसाठ यांना कृष्णा परदेशी याने शिवीगाळ करुन याचे अंगावर गाडी घाला याला जीवे ठार मारा अशी धमकी देवुन गाडी अंगावर घालु लागला.त्यावेळी मी तसेच माझी सासु पुष्पा, माझ मुलगा यश असे आम्ही गाड्यांना आडवे झालो असता माझे पती किशोर शिरसाठ यांचे अंगावर ढंपर चालवुन ढंपरची धडक देवुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

वाळू

पती किशोर शिरसाठ हे धडक दिल्याने रोडचे बाजुला पडले. त्यावेळी आम्ही घाबरुन रसत्याचे बाजुला झालो.त्यावेळी कृष्णा परदेशी व त्याचे साथीदाराने वाळूने भरलेले ढंपर व ट्रॅक्टर तेथुन पळवून नेले.त्यावेळी कृष्णा परदेशी, पप्पु परदेशी, गणेश परदेशी, विकी परदेशी, बंटी परदेशी, व गोट्या ड्रायव्हर (नाव महाती नाही) हे तिथेच थांबुन आम्हाला शिवीगाळ करत होते.त्यावेळी गावातील बरेच लोक गोळा झाले असता कृष्णा परदेशी यांने फोन करुन सुमारे १५ते २० अनोळखी इसम बोलावुन घेतले. आम्ही त्यांना गावत गोदावरी नदीतुन वाळू उपसा करु नका असे समजावुन सांगत असताना कृष्णा परदेशी व त्याचे सोबच्यांनी लाकडी दांडक्याने मला तसेच माझे पती किशोर यांना मारहाण केली.तसेच पप्पु परदेशी व गणेश परदेशी यांनी व त्यांचे सोबतच्यांनी रस्त्याचे कडेला पडलेले दगडे उचलुन आमचे दिशेने फेकुन मारल्याने तसेच त्यांचे कडे असलेल्या लाकडी दांडक्याने आमचे गावातील लताबाई बबन चकोर, दत्तु पंढरीनाथ आव्हाड, यश किशोर शिरसाठ, पल्लवी ज्ञानेश्वर शिरसाठ, शिवाजी निवृत्ती गिते, भाऊलाल परसराम डहारे यांना मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत.आमचे गावातील इतर बरेच जमल्याचे पाहुन कृष्णा परदेशी याने त्याचे ताब्यातील काळे रंगाची किया गाडी ही भरधाव वेगात काढुन माझा मुलगा यश याला जीवे मारण्याचे उद्देशाने त्यांचे अंगावर घातली.

त्यावेळी मुलगा यश हा बाजुला झाला असता त्याचे पायावरुन सदर गाडीचे चाक गेले.तो जखमी झाल्याने व घाबरल्याने तो जागीच बेशुध्द झाला.त्यावर कृष्णा परदेशी याने पुढे गाडी थांबवुन त्याचे पाठीमागे सर्व साथीदार हे उभे राहीले.त्यावेळी कृष्णा परदेशी मला उद्देशुन तु महाराची बाई आहेस.तु सरपंच झाली म्हणुन काय झाले तु शेवटी महाराचीच आहेस व महारांनो तुम्ही खुप माजलेत असे बोलुन जातीवाचक शिवीगाळ करुन जातीला उद्देशुन आम्हाला हिनवले व तुम्ही नेवासामध्ये आले तर तुमचा मर्डर झाला म्हणुन समजा अशी धमकी देवुन आमचे गावामध्ये दहशत निर्माण केली.त्यावेळेस त्याठीकाणी आजुबाजुस राहणारे लोक हे भितीपोटी घराचे दरवाजे लावुन घरात बसले तसेच काही आजुबाजुचे व गावातील काहींनी सदरचा प्रकार पाहून भितीपोटी घराला कुलुपे लावुन तेथुन पळुन गेले.

पोलीसांचा फौजफाटा आल्यानंतर आजुबाजुचे लोक आपले घरातुन बाहेर आले तसेच कुलुप लावुन पळुन गेलेले लोकही पुन्हा घरी आले आहेत. पोलीसांचा फौजफाटा आल्यानंतर पोलीसांनी जखमींना दवाखान्यात पाठविले. त्यानंतर नेवासा येथे जाऊन.जैनपुरच्या सरपंच शैला किशोर शिरसाठ यांनी वरील आरोपी विरोधात नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येऊन
कृष्णा पुनमसिंग परदेशी व गणेश पुनमसिंग परदेशी या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम (ॲट्रॉसिटी) कायद्यातील कलमे लागू झाल्याने सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील हे करीत आहेत.

“”” वाळू चोरीच्या गुन्ह्यामधील आरोपीवर जरब बसवण्यासाठी एम.पी.डी.ए.कायद्यातील तरतुदी
अन्वये आम्ही कायदेशीर चाचपणी करीत आहोत”””.

धनंजय अ. जाधव.
पोलीस निरीक्षक,
पोलीस ठाणे नेवासा.

newasa news online
वाळू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाळू
वाळू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाळू
error: Content is protected !!