ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मतदान

नेवासा फाटा – तालुक्यातील मुकिंदपुर नेवासा फाटा परिसरातील शांतीनगर, तारापार्क, अंबाडे वसाहत श्रध्दा अपार्टमेंट्स, साईतेज कॉलनी येथील नागरिकांनी लोकसभेत सह येणाऱ्या सर्व निवडणुकांवर मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवात लोकसभेच्या मतदानापासून होणार आहे.असे नागरिकांनी सांगितले.तहसीलदार संजय बिरादार यांनी नेवासा फाटा परिसरातील शांतीनगर, तारापार्क, अंबाडे वसाहत श्रध्दा अपार्टमेंट्स, साईतेज कॉलनी या गट नंबर 79 व 80 मधील अतिक्रमण केलेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याची नोटीस काढलेली असतानाही अतिक्रमण न काढता तहसीलदार संजय बिरादार निघून गेल्याने नागरिकांत नाराजी पसरली.

याचा जाब विचारण्यासाठी सर्व नागरिक तहसील येथे गेले असता तहसीलदार संजय बिरादार यांनी उडवा उडीची उत्तरे दिली.हा रस्ता लवकर मोकळा करून दिला नाही तर परिसरातील सर्व नागरिक नेवासा फाटा येथील नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येत्या दोन दिवसात रस्ता रोको उपोषण करण्यार आहे. यापुढील परिणामांची सर्व जबाबदारी तहसील व तहसीलदार संजय बिरादार यांची राहील.असा इशारा सुमन ठोंबरे, सुरेखा साळवे, लता लिहिणार, संगीता वंजारे, जया आगळे, मनीषा साळवे, शैला डिके सर्व महिला नागरिकांनी दिला आहे.

मतदान

“””तहसीलदार यांनी स्वतः अतिक्रमण धारकांना नोटीस काढली होती व अतिक्रमण पाडण्यासाठी स्वतः आले होते त्यानंतर काय झाले माहित नाही त्यांना जाब विचारला असेल ते वाटले रस्ता इथून निघत नाही हे अतिक्रमण काढता येत नाही नंतर योग्य ती कारवाई करू असे उत्तर तहसीलदार यांनी दिले.त्यानंतर त्यांनी बोगस पंचनामा करून त्यावर नागरिकांच्या खोट्या सह्या घेऊन तहसीलदार निघून गेले”””

-सौ.रजनी पंढुरे, नागरिक मुकिंदपूर.

“””तहसीलदार संजय बिरादार यांनी स्वतः अतिक्रमणधारकांना नोटीस काढली व अतिक्रमण काढण्यास सांगितले.भूमिलेख अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन मोजणी करून अतिक्रमण जागा ठरवून दिल्याप्रमाणे अतिक्रमण काढण्यासाठी जेव्हा स्वतः तहसीलदार अतिक्रमण काढण्यासाठी आले.त्यानंतर ते अतिक्रमण न काढता निघून गेले व अधिकाऱ्यां सोबत परस्पर बैठक घेतली.मग अतिक्रमण न काढण्याचा निर्णय घेतला.तहसीलदार या अतिक्रमण धारकांना पाठीशी घालत आहे का? अशी नागरिकात चर्चा आहे”””

-सौ.सुमन ठोंबरे., नागरिक मुकिंदपुर.

newasa news online
मतदान

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मतदान
मतदान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मतदान
error: Content is protected !!