ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

नेवासा

नेवासा – नेवासा येथील ज्ञानेश्वर उर्फ माऊली तोडमल रा. नेवासा खुर्द याने एक वर्षपूर्वी किशोर दिगंबर आवारे रा. भायगाव ता. वैजापूर जिल्हा संभाजीनगर यांच्याकडून मारुती सियाज ही गाडी खरेदी केली होती. सदर गाडीच्या व्यवहारातून माऊली तोडमल व किशोर आवारे यांच्यामध्ये काही दिवसांपासून वादविवाद चालू होते.

दि. 02/06/2024 रोजी रात्रौ 12.00 वाजण्याच्या सुमारास माऊली तोडमल हा मेव्हण्यासह मित्राचा वाढदिवसाचा साजरा करून भालगावमार्गे नेवासा बुद्रूककडे जात असताना रस्त्यात टोका संगम येथे लघवीला थांबले असता 1. किशोर दिगंबर आवारे 2. विठ्ठल दिगंबर आवारे 3. किशोर हरिश्चंद्रे 4. गणेश दिनकर कदम सर्व रा. भायगाव ता. वैजापूर जिल्हा संभाजीनगर व त्यांच्या समवेत अनोळखी तीन ते चार जण दोन वाहनांमधून आले व माऊली तोडमल यास विकलेली मारुती सियाज जबरदस्तीने घेऊन जाऊ लागले, त्यास माऊली तोडमल याने विरोध केला असता किशोर आवारे याने त्याच्याकडे असलेल्या देशी कट्ट्यामधून दोन राउंड फायर केले.

या घटनेनंतर सदरची माहिती माऊली तोडमल याने आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली डायल-112 या नंबरवर कॉल करून दिल्यानंतर पोलीस ठाणे नेवासाकडील स्टाफ तातडीने घटनास्थळी पोहोचला असता घटनास्थळापासून साधारण 200 मीटर अंतरावर सदरची मारुती सियाज ही टोका संगम फाट्यावर डिव्हायडरला धडकल्याने रस्त्यावरच उभी आढळून आली व मारुती सियाजच्या सीटवर एक देशी कट्टा आणि दोन जिवंत राऊंड मिळून आले आहे तसेच घटनास्थळी फायर केलेली एक रिकामी पुंगळी देखील मिळून आलेली आहे. माऊली तोडमल यास किरकोळ जखम झालेली आहे. दोन संशयीत आरोपी लासूर, ता. वैजापूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

newasa news online
नेवासा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नेवासा
नेवासा
नेवासा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नेवासा
error: Content is protected !!