ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वाढदिवस

नेवासा – लग्नाचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस नेवासा खडका रस्त्यावर असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमात वृद्धांना मिष्टान्न भोजन देऊन साजरा करण्याचा उपक्रम नेवासा तालुक्यातील खेडलेकाजळी येथील ढगे परीवाराच्या वतीने राबविण्यात आला.
शरणपूर वृध्दाश्रमाच्या प्रांगणात सायंकाळी राहुरी कृषी विद्यापीठ येथील कृषी शास्त्रज्ञ प्रा.डॉ.समीर ढगे यांनी आपले वडील कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे व मातोश्री सौ.निर्मलाताई ढगे यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके हे होते तर डॉ. अशोकराव ढगे,सौ. निर्मलाताई ढगे या दाम्पत्यासह,श्रीमती लताबाई हारदे,देविदास निकम,भेंडे येथील जिजामाता हायस्कूल च्या शिक्षिका श्रीमती अश्विनी मते,वृध्दाश्रम चालक रावसाहेब मगर,वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष पत्रकार बाळासाहेब देवखिळे,वृद्धाश्रम संपर्क प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण,अक्षय देवखिळे,मीडिया पत्रकार मंगेश निकम,गणेश ढगे,शिवाजी ढगे,सौ.शिलाताई देवखिळे, सौ.प्रज्ञा भोळे, सौ.ज्योती मगर यावेळी उपस्थित होते.

वाढदिवस


यावेळी वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष पत्रकार बाळासाहेब देवखिळे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले तर वृद्धाश्रम संपर्क प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण यांनी वृद्धाश्रमातील उपक्रमाची माहिती दिली.वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर यांनी विना अनुदानित असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमाला अन्नधान्यासह आर्थिक हातभार लावण्याचे आवाहन केले.
लग्नाच्या पन्नासव्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ.अशोकराव ढगे व सौ.निर्मलाताई ढगे या दाम्पत्याचा सत्कार वृद्ध आजींनी औक्षणाद्वारे शाल श्रीफळ देऊन केला.लोकसंपर्काद्वारे वृद्धाश्रमाला आर्थिक पाठबळ उभे करू अशी ग्वाही डॉ.अशोकराव ढगे व डॉ.समीर ढगे यांनी यावेळी बोलताना दिली.तर कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके यांनी रोख स्वरुपात वृद्धाश्रमाला एकविसशे रुपये देणगी दिली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ.अशोकराव ढगे यांची मुलगी श्रीमती अश्विनी ढगे व नात कु.प्रिया मते यांनी मनोगत व्यक्त करत डॉ.अशोकराव ढगे व सौ.निर्मलाताई ढगे यांच्या खडतर जीवनकार्य यावेळी बोलताना विषद केले.वृद्धाश्रम व्यवस्थापक संतोष मगर यांनी आभार मानले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृद्धांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.

वाढदिवस
वाढदिवस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाढदिवस
वाढदिवस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाढदिवस
error: Content is protected !!