ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Boat

Sindhudurga  Boat Accident : बोट पलटी झाल्यानंतर तीन जणांनी पोहून किनारा गाठला.  तर चार जण बेपत्ता होते, त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघे जण अद्याप बेपत्ता आहेत, शोध मोहीम सुरु आहे.(Sindhudurga  Boat Accident)

Sindhudurga  Boat : राज्यात गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक बोट पलटल्याची घटना समोर येत आहे. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले बंदरात (Sindhudurga  Boat Accident)  जाणरी एक बोट पलटल्याची  दुर्दैवी बातमी समोर  आली आहे.  या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण  बेपत्ता आहेत. बेपत्तांचा शोध सुरू आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार , वेंगुर्ले बंदरात रात्री मच्छिमार बोटींना  लागणार बर्फ घेऊन बोट घऊन जात  असताना बोट उलटली. या बोटीमध्ये  एकूण  सात खलाशी होते. बोट पलटी झाल्यानंतर तीन जणांनी पोहून किनारा गाठला.  तर चार जण बेपत्ता होते, त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघे जण अद्याप बेपत्ता आहेत, शोध मोहीम सुरु आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला बंदरातून रात्री मच्छिमारांना लागणारा बर्फाची वाहतूक सुरू असताना ही दुर्घटना घडला.(Sindhudurga  Boat Accident)   रात्री ढगांचा गडगडाट जोरदार वादळी वारे अशी परिस्थिती असल्यामुळे ही बोट भरकटल्याने हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता असलेल्या खलाशांपैकी  एक खलाशी रत्नागिरीतील तर तीन खलाशी मध्यप्रदेशातील असल्याचे समजते. अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू झाले.

Boat

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Boat
Boat

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Boat
error: Content is protected !!