ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

महापारेषण

नेवासा – अतिरिक्त कार्यकारी अभियंता महापारेषण किशोर त्रिंबक कातोरे (वय ४० वर्षे) रा.केडगाव.ता.जि.अ.नगर. यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी नऊ वर्षापासुन अतिरीक्त कार्यकारी अभियंता महापारेषण विभागात नोकरीस असुन सध्या अ.नगर ऊपविभाग येथे नेमणुकीस आहे. सध्या माझ्याकडे वाहिनी बांधकाम ऊपविभाग बाभळेश्वर.अ.नगर येथील अतिरीक्त कार्यभार आहे.त्या अंतर्गत सध्या महापारेषण च्या २२० KV विशविंड ते भेंडा या वाहिनीचे काम चालु आहे.सदरचे काम मौजे सौंदाळा.ता.नेवासा गावच्या हद्दीत चालु आहे.आम्ही शासकिय नियमानुसार मोबदला देण्यास तयार असताना देखील काही शेतक-यांचा त्यास विरोध आहे.सदरचे काम हे ऊपविभागीय दंडाधिकारी अ.नगर यांच्या आदेशानुसार चालु असुन आम्ही सदर कामासाठी सशुल्क तत्वावर पोलीस बंदोबस्त घेतलेला आहे.


दिनांक २२/०५/२०२४/ रोजी दुपारी १२.३० वा. च्या सुमारास आम्ही तसेच सहा.अभियंता दिपक कैलास सिंग, अति.कार्य.अभियंता ओमप्रकाश मधुकर राजगुरु, सहा.अभियंता दिपक निशाद, सहा.अभियंता सागर गोविंद पिंगटे, सहा.तंत्रज्ञ रोहीत नागपुरे, सहा.तंत्रज्ञ संतोष लांडे असे आम्ही पोलीस बंदोबस्तासह बंडु रामहरी ठुबे, रा.सौदाळा.ता.नेवासा यांच्या शेत गट क्र – १०६/२ मध्ये महापारेषण च्या २२० KV च्या मनोरा क्र.१३५ पायाभरणीच्या कामासाठी तेथे गेलो होतो.त्यावेळी सदर ठिकाणी बंडु रामहरी ठुबे यांचा मुलगा संजय बंडु ठुबे यास आम्ही बोलाविले असता तो तेथे आला नाही.त्याने त्याची दोन मुले (नाव माहीत नाही), त्याचा एक चुलत भाऊ (नाव माहीत नाही) व गावातील ईतर दोन लोक पाठविले.

महापारेषण

त्यावेळी आम्ही त्यांना तुमच्या शेतातल्या मनो-याची आज पायाभरणी व पंचनामा (जागेचा व फळझाडांचा) करायचा आहे असे सांगीतले असता वरील सर्व 5 ईसम आम्हाला तुम्ही येथुन निघुन जा, येथे आम्ही तुम्हाला काम करुन देणार नाही असे म्हणाले.तसेच संजय बंडु ठुबे आल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी बोला, आज आम्ही तुम्हाला काम करुन देणार नाही असे म्हणुन संजय ठुबे यांच्या मुलांनी त्यांच्या मोबाईल मध्ये आमच्यावर दबाव टाकण्यासाठी सर्व शुटींग करुन कामास आडवे आले.सदर वेळी झाले प्रकाराबाबत कर्मचारी सहा.तंत्रज्ञ रोहीत नागपुरे यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये सर्व शुटींग केली व आम्ही सदर ठिकाणाहुन काम न करता परत निघुन गेलो.


तरी दि. २२/०५/२०२४/ रोजी दुपारी १२.३०. वाच्या सुमारास आम्ही महापारेषणच्या २२० KV च्या मनोरा क्र.१३५ च्या पायाभरणीच्या कामासाठी बंडु रामहरी ठुबे.रा.सौंदाळा.ता.नेवासा यांच्या शेत गट क्र – १०६/२ मध्ये गेलो असता तेथे आलेल्या लोकांना आम्ही ऊपविभागीय दंडाधिकारी अ.नगर यांचा आदेश दाखवुन देखील त्यांनी आदेशाची अवज्ञा करुन आम्हास काम करण्यास आडवे येवुन काम करुन दिले नाही म्हणुन 1) संजय बंडु ठुबे 2) त्याची दोन मुले (नाव माहीत नाही) 3) संजय ठुबे यांचा भाऊ (नाव माहीत नाही) 4) गावातील ईतर दोन लोक (नाव माहीत नाही) यांच्या विरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने नेवासा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करत आहे.

newasa news online
महापारेषण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महापारेषण
महापारेषण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महापारेषण
error: Content is protected !!