ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रामेश्वरम

घोडेगाव – २७ एप्रिल पासुन श्री घोडेश्वरी देवी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात सुरु होणार आहे. या निमित्ताने श्री घोडेश्वरी देवीस गंगाजल अभिषेक होत असतो. यंदा रामेश्वरम् येथून आणलेल्या गंगाजलाने अभिषेक होणार आहे.तेव्हा येथील पंधरा नागरिक आज रामेश्वरम् कावड यात्रे साठी शनिवारी रवाना झाले. गोरक्षनाथ लोखंडे ,बबन शिदोरे यांचे मार्गदर्शनाखाली यंदाचे पाचवे वर्ष आहे. या अगोदर काशी,द्वारका, जगन्नाथ पुरी,हरिद्वार येथुन कार्ड आणली गेली. यंदा रामेश्वरम् येथून कावडीने पाणी आणणार आहेत. तेरा एप्रील ते अठ्ठावीस एप्रील पर्यंत कावड यात्रा चालणार आहे.

कावड यात्री घोडेगाव पासुन रवाना होऊन परळी, औंढा,माहुरगड, श्री शैल्यम,तिरुपती बालाजी, शिक्षकांची,विष्णु कांची, पक्षतिर्थ,श्रीरंगम, रामेश्वरम्, कन्याकुमारी,मदुराई,म्हैसुर गोकर्ण, मुरुडेश्वर, अंजनी पर्वत,पंपा सरोवर, पंढरपूर ते घोडेगाव असा पंधरा दिवस प्रवास होणार आहे. कावड आणण्यासाठी गोरक्षनाथ लोखंडे,बबन शिदोरे,भानुदास सोनवणे,कुमार कुलकर्णी, रामभाऊ गायवळे,बापुराव एळवंडे, गणेश शिदोरे, नामदेव ब-हाटे, जालिंदर कदम, पोपट सोनवणे, सुधाकर
ब-हाटे, ह भ प सिताराम महाराज ईखे, सोपान खाटेकर लोहकरे दाजी रवाना झाले आहे.

ग्रामस्थांनी कावड यात्री ना वाजता गाजत निरोप दिला. निरोप देण्यासाठी गोपीनाथ हुळहुळे, शिवाजी ब-हाटे, जनार्दन लोखंडे, भानुदास खाडे, प्रकाश शिदोरे, रविंद्र शिदोरे, नितीन बर्डे, दिलीप शिंदे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

newasa news online
रामेश्वरम

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रामेश्वरम
रामेश्वरम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रामेश्वरम
error: Content is protected !!