ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Accident

Ahmednagar Accident News : धावत्या ट्रकमध्ये चक्कर येऊन चालक बेशुद्ध झाला. क्लिनरने प्रसंगावधान दाखवून ट्रक रस्त्याच्या कडेला नेला. क्लिनरने स्टेअरिंग थोडे रस्त्याच्या बाजूने वळविले.

Ahmednagar Accident News : धावत्या ट्रकमध्ये चक्कर येऊन चालक बेशुद्ध झाला. क्लिनरने प्रसंगावधान दाखवून ट्रक रस्त्याच्या कडेला नेला. क्लिनरने स्टेअरिंग थोडे रस्त्याच्या बाजूने वळविले. चालक बलविंदरसिंग यांचा पाय नेमका ब्रेकवर पडला, अन… मालवाहू ट्रक चालकाला भोवळ आल्याने नगर- मनमाड या महामार्गावरून जात असताना तालुक्यातील येसगाव शिवारात ट्रक रोडच्या कडेला काटवनात गेला. यावेळी मोठा अपघात होताना वाचला असून या घटनेतील वाहन चालकास दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

बलविंदरसिंग भगेल सिंग (वय ४९, रा. रोगला, जि. संगरूर, राज्य पंजाब) हे मंगळवारी (दि. ११) दुपारी एकच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्याने ट्रक घेऊन जात होते. कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात त्यांचा ट्रक असताना त्यांना अचानक चक्कर आली. क्लिनरने स्टेअरिंग थोडे रस्त्याच्या बाजूने वळविले.

चालक बलविंदरसिंग यांचा पाय नेमका ब्रेकवर पडला, त्यामुळे ट्रक थांबला. बलविंदरसिंग यांच्या तोंडाला फेस येऊन ते बेशुद्ध झाले. त्यांना तत्काळ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या प्रकरणी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात माहिती अशी की, बलविंदरसिंग मांगेल (वय ४६) हा त्याची (पीबी १३ बीएस ८३९७) क्रमांकाच्या ट्रक मध्ये लुधियाना वरून किराणा माल घेऊन जात असता मंगळवारी रात्री उशिरा कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात नगर-मनमाड महामार्गावर ट्रक चालकास भोवळ आली व त्याचा ट्रक वरील ताबा सुटला व गाडी रस्त्याच्या कडेला खाली काटवनात गेली.

तेव्हा त्यांच्या सोबतीला असलेल्या मदतनीसाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवली. याबाबत क्लिनर सनी सोनू चंडाल (वय १८, रा. पातरा, जि. पटियाला, राज्य, पंजाब) याने पोलिसांना खबर दिली. त्यावरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. एन. एस. शेख करीत आहेत.

या रस्त्यांवरून दिवस रात्र जड वाहतुक चालू असते. परंतु प्रसंगावधान राखून क्लिनरने गाडी थांबवली, अन्यथा मोठा प्रसंग ओढवला असता.

Accident
Accident

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Accident
Accident

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Accident
error: Content is protected !!