ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Horoscope Today

Horoscope Today : शनिवार २७ एप्रिल २०२४

Horoscope Today 27 April 2024 : पंचांगानुसार, आज 27 एप्रिल 2024, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवारचा दिवस  कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास 

आपल्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या व्यक्तींचा सहवास लाभेल, त्यांच्या सहकार्याने बरीच कामे मार्गी लागतील.

वृषभ रास 

विद्यार्थ्यांचा खेळीमेळीत अभ्यास होईल. आज त्यांचं अभ्यासात मान लागेल. व्यापारात आर्थिक लाभ झाल्यामुळे मागील बरीच देणी देता येईल.

मिथुन रास 

आज मान व प्रतिष्ठा मिळण्याचे अनेक प्रसंग येतील आणि त्यातून आर्थिक लाभही होऊ शकतात. महिलांना संतती सौख्य लाभेल. 

कर्क रास 

आज जरा कष्ट करण्याचा दिवस आहे. राजकारणात पुढाकाराने अनेक गोष्टी कराल. कामात यश मिळेल. आजचा दिवस यशाचा असेल. नोकरी-व्यवसायात तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील.

सिंह रास 

आज लोकांच्या पसंतीला उतराल. मुलांच्या मताशी सहमत न झाल्यामुळे त्यांच्याशी वाद-विवाद संभवतात. आज रागावर आवर घाला.

कन्या रास 

सौख्यामध्ये काही कमतरता आहे असे सतत जाणवत राहील. काही गुप्त गोष्टी करण्याकडे कल राहील. 

तूळ रास 

उष्णतेच्या विकारापासून सावधानता बाळगावी. महिलांना जरा जास्तच श्रम पडतील. आज आरोग्याची काळजी घ्या, थोडा त्रास जाणवण्याची संभावना आहे.

वृश्चिक रास 

काही नवीन गोष्टी करण्याकडे कल राहील. निर्मिती आणि संशोधनपर काम हातून घडणार आहे. आज तुमचा मूड चांगला राहील, तुम्ही ऊर्जेने परिपूर्ण असाल.     

धनु रास 

अनपेक्षित संपत्ती लाभ होतील. स्वभाव थोडा लहरी बनेल. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा इतरांना फायदा करून द्याल. 

मकर रास 

इतरांशी मिळून मिसळून राहून काम कराल, त्यामुळे लोकांशी संबंधही चांगले राहतील. महिलांना तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल.

कुंभ रास 

घरातील वातावरण थोडे शिस्तीचे राहिल्यामुळे त्या वातावरणाशी जमवून घ्यावे लागेल. घरातील मोठ्या लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. 

मीन रास

आज थोडी धावपळच होणार आहे. परंतु तुमची कष्ट करण्याची ताकद चांगली राहील.

Horoscope
Horoscope

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Horoscope
Horoscope

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Horoscope
Share the Post:
error: Content is protected !!