ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मारहाण

नेवासा – पतीने दारू पिवून येऊन पत्नीला शिवीगाळ करून चाकूने मारहाण करत जखमी केल्याची घटना नेवासाफाटा येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शितल स्वप्नील घनवट (वय ३०) रा. नेवासाफाटा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, माझे पती स्वप्नील हे ड्रायव्हर काम करतात. त्यांना दारू पिण्याचे व्यसन आहे. २६ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मी घरी स्वयंपाक करत असताना पती दारू पिवून आले व मला विनाकारण शिवीगाळ करू लागले.

तेव्हा मी त्यांना समजावून सांगितल्याचा राग आल्याने त्यांनी मला स्वयंपाक घरातील चाकूने माझ्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ तसेच उजव्या हाताच्या अंगठ्याच्या जवळ मारहाण करून जखमी केले. शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोणाला काही सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून स्वप्नील अंकुश घनवट याचेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

newasa news online
मारहाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण
Share the Post:
error: Content is protected !!