ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मतदान

नेवासा – केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर अनिष्ट वेळ ओढवल्याचा आरोप करत गळ्यात कांद्याची माळ घालून व हातात दुधाची बाटली धरून शेतकरी संघटनेचे नेते त्रिंबक भदगले यांनी अनोख्या पद्धतीने केलेल्या मतदानाची राजकीय, प्रशासकीय तसेच सामाजिक पातळीवर चांगलीच चर्चा रंगली आहे.

मराठा आरक्षण तसेच शेतमालाला भाव मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचंड सामाजिक उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर यंदाची लोकसभा निवडणूक प्रक्रिया संपन्न होत आहे. मतदार मतपेटीच्या माध्यमातून केंद्र सरकार विरोधातील आपली खदखद मोठ्या प्रमाणावर व्यक्त करण्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने प्रामुख्याने सत्ताधारी राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह नेते व कार्यकर्त्यांना राज्यात ठिकठिकाणी उत्स्फूर्त हिसके अनुभवयास मिळाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकडे राजकीय जाणकारांचे बारीक लक्ष लागून राहिले आहे.

मतदान

शेतकरी संघटनेचे नेते त्रिंबक भदगले यांनी तालुक्यातील उस्थळ दुमाला केंद्रावर मतदानाचा हक्क बजावताना गळ्यात कांद्याची माळ आणि हातात दुधाची बाटली धरली होती. केंद्र सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असल्याने त्यांचा निषेध करत त्यांनी मतदानाचा हक्क बजावतानाची छायाचित्रे समाज माध्यमातून वेगाने फिरत होती.

मतदान
मतदान

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मतदान
मतदान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मतदान
Share the Post:
error: Content is protected !!