ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आम आदमी पार्टी

नेवासा – नेवासा आगाराला नवीन बसेस उपलब्ध होण्यासाठी आम आदमी पार्टी आता आमरण उपोषण करणार असून यासाठी जनतेला बरोबर घेऊन त्रिव आंदोलनाचा लढा उभारणार असल्याचे आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष अँड.सादिक शिलेदार यांनी सांगितले. याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना अँड.सादिक शिलेदार म्हणाले की नेवासा तालुक्याचे मुख्य केंद्र बिंदू असलेले तीर्थक्षेत्र नेवासा ही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी आहे, ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाची निर्मिती येथे झाली आहे.ज्या खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबासाठी जगातील एकमेव मंदिर बांधले गेले आहे. तसेच शनिशिंगणापूर येथे जगप्रसिध्द असलेले शनि महाराजांचे मंदिर आहे.

भू लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेले श्री.क्षेत्र देवगड येथे श्रीगुरुदेव दत्त पीठ आहे. नेवासा बुद्रुक येथे खंडोबांची सासुरवाडी व म्हाळसादेवीचे माहेर घर आहे. या सर्व ठिकाणी देश भरातून भाविक अभ्यासू व्यक्तिमत्व भेट देण्यासाठी तसेच दर्शनासाठी दरवषी मोठ्या संख्येने येत असतात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नेवासा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी एस.टी. आगारास परवानगी देऊन नागरिकांना दळण वळणाची सोय केलेली आहे. मात्र गेल्या दहा वर्षांपूर्वी नेवासा आगाराला ५६ बस गाड्या होत्या, आज रोजी मात्र ४२ गाड्या आगारास उपलब्ध आहेत.वास्तविक आज नेवासा एस टी आगारास १०० ते १५० गाड्यांची आवश्यकता आहे.

आम आदमी पार्टी

गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यातील इतर डेपोंच्या जुनाट तसेच नेहमी नादुरुस्त होणाऱ्या गाड्या नेवासा आगारास पुरवल्या जात आहेत. त्या रस्त्यात बंद पडणे, इंजिन फुटणे, टायर फुटणे या सारख्या समस्यांमुळे प्रवाशांचा वेळोबरोबर आर्थिक नुकसान होत आहे. वेळोवेळी सामाजिक संस्थांनी या प्रश्नांबाबत आंदोलनही केलेली आहेत.या नादुरुस्त गाड्यांमधून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. या गाड्या वापरतांना चालक वाहकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ते सुध्दा जुनाट गाडया मुळे व नादुरुस्त होणाऱ्या गाड्यांमुळे कामगिरीवर जाण्यास अपघाताच्या भितिने घाबरत आहेत. आपले महामंडळ एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे काय ? असा प्रश्न नागरिकांना व चालक वाहकांना पडला आहे.

तसेच गाडी बदलने अथवा इंधन टाकणे या नावाखाली प्रवासी घेऊन एस.टी. गाड्या तास न तास एस.टी. डेपोत उभ्या केल्या जातात.त्याचा त्रास देखील प्रवाशांना होत आहे. नेवासा आगाराने जुनाट गाडयांमुळे लांब पल्याच्या मुंबई, माहूर, कल्याण, पंढरपूर, सुरत, धुळे, पुणे आदि ठिकाणी जाणाऱ्या गाड्या बंद केल्या आहेत. त्याचा त्रास नेवासा तालुक्यातील प्रवाशी नागरिकांसह राज्य भरातून येणाऱ्या भाविकांना सहन करावा लागत आहे. नेवासा आगार या आजारी गाड्यांचा वापर करूनही महामंडळास आर्थिक चांगला हातभार लागत आहे. मात्र महामंडळ नेवासा आगारावर अन्याय करत आहे. याबाबत निवेदन देऊन निवेदनाची दखल घेऊन नेवासा आगारास ५० नवीन लालपरी बस गाड्या उपलब्ध करुन देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे प्रवाशांचे व भाविकांचे हाल होणार नाही या दृष्टीने कारवाई करण्यात यावी.

आम आदमी पार्टी


या मागणीसाठी कुठलीही पूर्व सुचना न देता आम आदमी पार्टी चे वतीने नेवासा बस स्थानकात नागरिक, भाविक यांचेसह आमरण उपोषणास बसणार  असा इशारा देण्यात आला व निवेदन व्यवस्थापकीय संचालक परिवहन विभाग मुंबई यांना देणेत आले असून त्याच्या प्रती मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथराव शिंदे, विभाग नियंत्रक अहमदनगर यांना देण्यात आल्या आहेत. सदर निवेदनावर तालुका अध्यक्ष ॲड.सादीक शिलेदार,शहराध्यक्ष संदीप अलवने,प्रवीण तिरोडकर, ज्येष्ठ नेते भैरवनाथ भारस्कर, सरोदे सर,किरण भालेराव, सलीम भाई सय्यद,अण्णा लोंढे,करीम भाई सय्यद, विठ्ठल मैंदाड, सुमित पटारे,विठ्ठल चांडे, बाळासाहेब साळवे यांच्या सह्या आहेत..

आम आदमी पार्टी
आम आदमी पार्टी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आम आदमी पार्टी
आम आदमी पार्टी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आम आदमी पार्टी
error: Content is protected !!