ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

क्रिकेट

नेवासा | मकरंद देशपांडे – तालुक्यातील खेळाडूंसाठी एक नवीन स्पर्धेची संकल्पना ज्ञान फाउंडेशन व पसायदान स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने भरवण्यात येत आहे ही स्पर्धा नेवासा तालुक्यातील नवीन पिढीतील खेळाडूंसाठी पर्वणी ठरणार आहे तसेच या स्पर्धेतून नवीन खेळाडू तयार व्हावे या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे .नेवासा शहरांमध्ये पहिल्यांदाच भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचा खेळाडूंचा लिलाव बोली पद्धतीने व ट्रॉफी चे अनावरण सोहळा लक्ष्मी मंगल कार्यालय नेवासा येथे उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे, मकरंद देशपांडे व आम्ही नेवासकरचे अध्यक्ष सौरभ मुनोत व विकास खराडकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

क्रिकेट

या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत त्यात मक्तापूर ब्लास्टर-मक्तापूर (संघमालक-भरत भाऊ काळे, मनोज भाऊ झगरे, कर्णधार-संदीप वाघमारे), श्री वॉरियर्स- नेवासा फाटा (संघमालक-प्रतापराजे हांडे,कर्णधार-अशोक पानखडे),दहिवळकर सराफ- नेवासा फाटा (संघमालक-विजय शेठ दहिवाळकर,रितेश भाऊ कराळे,कर्णधार-नितीन बोरुडे), जनता गॅरेज- नेवासा(संघमालक-धनु भाऊ काशीद,राहुल भाऊ थोरात,कर्णधार-प्रशांत वाघ), डॉक्टर इलेव्हन- कुकाणा(संघमालक-सुनील तांबे, डॉ. मनोज शिंदे, कर्णधार-भूषण मिरपगार) ,छत्रपती शिवाजी किंगज ब्लास्टर- नेवासा फाटा (संघमालक- डॉ. शिवाजी गोरे,कर्णधार-डॉ. शंकर वंजारी),रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी- नेवासा(संघमालक- आसिफ शेख, रिजवान खान,कर्णधार-अशोक कुदळे),शिवम फायटर – नेवासा बु. (संघमालक-सुधीर भाऊ जायगुडे, कर्णधार-अमोल शिंदे)या संघांनी सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी नेवासा तालुक्यातील १४२ खेळाडूंनी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरले होते आणि त्यांना लिलाव बोली पद्धतीने प्रत्येक संघात सामाविष्ट करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे बक्षीसदाते ज्ञान फाऊंडेशन,नेत्रा लॉन्सचे मालक अनिल डौले, प्रकाशशेठ जगताप, विकास फर्निचर व शेरा गोल्डचे मालक कमलेश ओस्तवाल,जहीर बागवान हे असून शिवशक्ती आईस्क्रीम,मा.घुले पाटील पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार पाटील, कांदे चष्मावालाचे मालक स्वप्निल कांदे,साई श्रद्धा ब्रिक्सचे मालक आदित्य खंडाळे, लक्ष्मी मंगलकार्यालय, संदीप लाईट डेकोरेशन, डिझायनर सागर गंधारे,अशा भेळचे मालक विजय गायकवाड, अनिल डिजिटल, नवनाथ वीट उत्पादक ॲड सप्लायर्स, ऋषिकेश बनकर,जगदंब स्पोर्ट्स ॲड टी-शर्ट प्रिंटचे मालक किशोर पठाडे, हॉटेल दत्तप्रसादचे मालक अमोल सुरोशे, जगदंबा इलेक्ट्रिकल्सचे मालक अनिल शिर्के, एकता सायकल मार्टचे मालक सतीश गायके,मापारी मिल्क ॲड केक शॉपचे मालक प्रवीण मापारी, स्वस्तिक प्युरिफायरचे मालक अनिल शिंदे, मेनका सायकल मार्टचे मालक अन्सार भाई बागवान, सोनल ॲग्रो सीड्स- कुकाणा,जी. ए. विखोना, शिवा मोरे, अजय कोळेकर, सौ. शर्मिला शिंदे यांचे सौजन्य लाभले आहे तसेच ज्ञान फाउंडेशनचे सदस्य, गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य ,पसायदान स्पोर्ट्स क्लबचे सदस्य, सुदर्शन क्रिकेट अकॅडमीचे सदस्य,ज्ञानाई डिजिटल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या लिलाव पध्दतीचे सूत्रसंचालन इम्रान पठाण सर यांनी केले.

क्रिकेट

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

क्रिकेट
क्रिकेट

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

क्रिकेट
Share the Post:
error: Content is protected !!