ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शंकरराव

नेवासा फाटा – शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उबाठा सेनेचे उमेदवार श्री .भाऊसाहेब वाकचौरे यांनी मोठा दणदणीत विजय संपादित केला. शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांना पराभूत करून पुन्हा एकदा आपले वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केले.
वाकचौरे यांना निवडून आणण्यासाठी नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी प्रचाराची एकहाती धुरा हाती सांभाळून निष्ठावंत शिवसैनिकाप्रमाणे कुठलाही जास्त गाजावाजा न करता अतिशय शिस्तबद्धपणे आपल्या कार्यकर्त्यांना हाताशी घेत वाकचौरेच्या मागे ठामपणे उभे राहून उद्धव ठाकरेंच्या विश्वासाला तडा लावू न देता विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली. त्याबद्दल दस्तूर खुद्द उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेत आमदार गडाख यांना शुभेच्छा पाठवल्या.

सोनई येथे झालेल्या जाहीर सभेत आमदार गडाखांनी उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द पाळल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे भावनिक होऊन कौतुक करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांची लाट असतानाही महाराष्ट्रामध्ये मात्र महाविकास आघाडी आणि विशेष करून शिर्डी लोकसभा मतदार संघावर संपूर्ण राज्याचे लक्ष होते या लक्षवेधी लढतीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांनी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्येआता शंकरराव गडाख यांची बाजू आता अधिक मजबूत झाली असून विरोधकांनी मात्र याची धास्ती घेतली आहे.

शंकरराव
शंकरराव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शंकरराव
शंकरराव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शंकरराव
error: Content is protected !!