ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पोलीस

गणेशवाडी – सोनई पोलीसांनी मुळा कारखाना परिसर व चांदा येथील बेकायदेशीर दारु विक्रेत्यांवर कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. २८ एप्रिल रोजी मुळा कारखाना सोनई येथे शनिशिंगणापूर रोडवर टपरीच्या आडोशाला आरोपी गोविंद अण्णा फुलमाळी वय २७ हा बेकायदा दारु विक्री करत असल्याचे आढळून आले.त्याचेकडुन २४५० रु किंमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. पो. काॅ. निखिल तमनर यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन वरील आरोपी विरुद्ध गु. र. नं. १९४, कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोना बि. जी. बाचकर हे करत आहेत. तर दि. २९ एप्रिल रोजी चांदा येथे गावच्या नदीजवळ टपरीच्या आडोशाला आरोपी अतिक इसाक शेख वय २९ हा बेकायदा दारु विक्री करताना आढळुन आला. त्याच्या कडून १९६० रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली. पोना सोमनाथ झांबरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन वरील आरोपी विरुद्ध गुन्हा र नं१९६.कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो हे काॅ. एम आर आडकित्ते हे करत आहेत.

दारु
दारु
दारु

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दारु
दारु

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दारु
Share the Post:
error: Content is protected !!