ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

कारागृह

नेवासा – खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या महिलेने न्यायलयीन कोठडीत गोंडस बाळाला जन्म दिला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पोलीस ठाणे नेवासा येथे दाखल असलेल्या व खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या महिला आरोपीची न्यायालयीन कोठडीतच प्रसूती झाली आहे.तालुक्यातील खड्का फाटा येथे दिनांक 03/12/2023 रोजी रामेश्वर रामचंद्र कोरडे याचा खून झाल्याने पोलीस ठाणे नेवासा येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये अश्विनी विशाल बिरुटे रा. वरखेड ता. नेवासा या महिला आरोपीचा देखील समावेश असल्याने सदरच्या महिला आरोपीला नेवासा पोलिसांनी दि. 04/12/2023 रोजी अटक केली होती. अटकेच्या वेळी सदरची महिला ही गरोदर होती. मागील 9 महिन्यांपासून सदरची महिला आरोपी ही न्यायालयीन कोठडीतच आहे.

सदरच्या महिला आरोपीने जामीनसाठी सत्र न्यायालय येथे अर्ज केला होता परंतु गुन्हा गंभीर असल्याने मा. न्यायालयाने सदर महिलेचा जामीन अर्ज फेटाळला होता. अटकेच्या वेळी सदरची महिला ही गरोदर असल्याने मागील 9 महिन्याच्या काळामध्ये तिची देखभाल नेवासा पोलीस ठाण्याकडे असलेल्या सुषमा जाधव, भारती पवार व वर्षा कांबळे या महिला पोलिसांनी केली होती, तिच्यावर वेळोवेळी ग्रामीण रुग्णालय नेवासा येथे गर्भवती कालावधीत उपचार केले होते. दरम्यान तिला 9 महिने पूर्ण झाल्यानंतर सोमवारी रात्री कळा येऊ लागल्याने तिला प्रथम ग्रामीण रुग्णालय नेवासा व नंतर सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे भरती केल्याने तिची दिनांक 05/06/2024 रोजी सुखरूप प्रसूती होवुन गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सध्या तिच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती पो.नि.धनंजय जाधव यांनी दिली आहे.

newasa news online
बाळ

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बाळ
बाळ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बाळ
error: Content is protected !!