ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आमदार

नेवासा – कुणाचे एक योगदान बंद झालं तर दुसरं योगदान देण्यासाठी संधी उपलब्ध असते हे सर्व आपोआप उघडत असतं जीवनामध्ये नियमावली ठेवली तर चांगल्या माणसाच्या सहवासात राहणे हे मला इथं महाजन मॅडम यांच्या रूपाने शिकायला मिळालं आज आपण सर्व कामे सोडून महाजन मॅडम यांच्या निरोप समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत चे कारण म्हणजे माझ्या मॅडमची कार्य शैली असे बोलताना लोकनेते मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच माजी आमदार नरेंद्रजी घुले पाटील म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले की त्यांनी तीस वर्ष समाजासाठी दिले त्याचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा असून नरेंद्र पाटील घुले पुढे बोलताना म्हणाले की आपल्या लोकनेते मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेमध्ये राज्याला मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्त्व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे सारखे व्यक्तिमत्व आपल्या संस्थेमध्ये घडले याचा अभिमान सर्वांना आहे व स्वामी प्रकाशानंगिरीजी महाराजांची दखल देवगड देवस्थानची गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांनी घेतली त्यांचा आम्हाला नेहमीच सार्थ अभिमान आहे.

तसंच एक विद्यार्थी गोगलगाव शाळेतून एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर नाशिक येथे तयार झाला तसेच गोगलगावच्या सरपंच शिल्पाताई दिलीपराव मते ह्या उत्कृष्ट चित्रकार आहेत त्यांच्या एक एक चित्रफिती 25 लाखापर्यंत विकल्या जातात याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे अशा शब्दांमध्ये गोगलगावच्या सरपंच शिल्पाताई दिलीपराव मते यांचे माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी तोंड भरून कौतुक केले.

तसेच ते शेतीविषयक संदर्भात बोलताना म्हणाल की ज्यावेळी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी भेंडा कारखान्यांनी नेवासा तालुक्यातील अनेक भागांमध्ये पाणी पोहोचवण्याचे काम दुष्काळ परिस्थितीमध्ये केले हे सर्व स्वर्गीय लोकनेते मारूतराव घुले पाटील तसेच स्वर्गीय सुदामरावजी मते पाटील यांची दूरदृष्टी व विचारसरणी आहे. माजी.आ.नरेंद्र घुले पाटील हे श्रीमती भागुबाई महाजन मॅडम यांच्या निरोप समारंभ प्रसंगी गोगलगाव येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या सुदामराव पाटील मते माध्यमिक विद्यालय मध्ये बोलत होते.

या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी देवगड देवस्थानचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे पिताश्री ह .भ.प.दिनकर महाराज मते हे होते. तसेच व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रजी घुले पाटील, एडवोकेट देसाई आबा देशमुख, गोगलगावच्या विद्यमान सरपंच सौ.शिल्पाताई दिलीपराव मते, दिलीपराव मते, माजी सरपंच योगेश मस्के, अनिल मते, राजेंद्र मते, काकासाहेब शिंदे, कल्याणराव म्हस्के, जिल्हा शिक्षक भरती कार्यवाहक संजय भुसारी, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद सुदामराव मते पाटील माध्यमिक विद्यालय गोगलगाव तसेच लोकनेते मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक वृंद व सर्व गोगलगाव ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मान्यवरांचे स्वागत गीत म्हणून स्वागत केले तसेच मान्यवरांचे स्वागता वेळी फटाक्यांच्या आतिश बाजी करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष सूचना देशमुख सरांनी मांडली तसेच काळे सरांनी अनुमोदन दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब गघावटे सर तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव गरड सर यांनी केले.

याप्रसंगी महाजन मॅडम बोलताना म्हणाल्या की मी एक सर्व साधारण कुटुंबातील श्री असून माझ्या पाठीमागे मला घडवण्यासाठी माझे पतीदेव शंकर ब्राह्मणे यांनी मोठी मदत केली लग्नानंतर मला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले व त्यामध्ये मी अनेक परीक्षा मध्ये उत्तीर्ण झाले त्यामध्ये मोलाचे सहकार्य माझे पतीदेव शंकर ब्राह्मणी यांनी मला केले त्यापुढे बोलताना म्हणाले की घरची परिस्थिती बिकट होती त्यामध्ये आर्थिक उत्पन्नाचे साधन नव्हती आम्ही सर्व चार पाच बहिणी होतो माझा जन्म 31 मार्च 1966 रोजी झाला वडील शंकर व आई मिनाबाई मोल मजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवत होते.

त्या काळामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी होते माझ्या आई-वडिलांना चार मुलीच होत्या माझी आईला शिक्षणाविषयी प्रचंड आवड होती तिने आम्हाला जमेल त्या मार्गाने शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या भावंडामध्ये माझा क्रमांक पाचवा त्या काळामध्ये मुलीची शिक्षणाचे प्रमाण कमी होते ती नेहमी म्हणायची की मला जरी मुली असल्या तरी मी त्यांना शिकवीन मोठ करीन आईने आम्हाला चांगले संस्कार व घडवण्याचा प्रयत्न केला मी एफ .वाय .बी .ए शिकत असताना माझे लग्न पाटबंधारे खात्यात नोकरीला असलेले सर्वांना परिचित असलेले नेवासा तालुक्यातील दिघी गावच्या गोविंदराव ब्राह्मण यांच्याशी झाले पुढे शिक्षणाची इच्छा मनात होती, त्यातूनच पतीने साथ दिली व पुढील शिक्षण संत ज्ञानेश्वर कॉलेजमध्ये झाले एम. ए .मराठी नंतर बी.एड करून एम .ए हिंदी केले माझ्या शैक्षणिक प्रवासामध्ये माझ्या आईचे व पतीचे मोलाचे योगदान आहे.

आईने पाया घातला तर पतीने त्यावर कळस चढविला त्या काळामध्ये राऊंड कम्पलेट करून पैसे भरवायचे होते त्यावेळी माझ्या पतीचे मित्र रंधरे साहेब व ठोंबरे साहेब हे पावसाळ्यामध्ये चिखलामध्ये चिखल तुडवत दिघी मध्ये आले आम्ही बारामती येथे गेलो व तेथे ऍडमिशन घेतले त्या दिवशी तार घेऊन ते दोघे आले नसते तर माझे स्वप्न कधीच पूर्ण झाली नसते बी.एड बारामती येथे शारदा नगर येथे उत्तीर्ण झाले उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीचा शोध सुरू झाला आम्ही त्यावेळी नेवासा फाटा येथे ऐरिकेशन कॉलनी मध्ये राहत होतो लोकनेते मारुतरावजी घुले पाटील संस्थेमध्ये अकरा जागा भरवायची जाहिरात निघाली आणि ती जाहिरात मी पेपरला वाचली व लगेच अर्ज केला मोठ्या साहेबांनी अर्जाचा विचार करून संस्थेत नोकरी मिळवून दिली. त्यावेळी माझा आनंद गगनात मावेना त्या देव माणसाचे रून कसे फेडावे कळत नाही आणि ती सर्व माणसे हे माझ्यासाठी देवच होती .

आणि जिजामाता माध्यमिक विद्यालय भेंडा येथील जो प्रवास सुरू झाला मी स्वतःला भाग्यवान समजते की देवाने मला शिक्षकेची ज्ञान-दानाची नोकरी दिली आज माझी विद्यार्थी मोठमोठ्या पदावर कार्यरत आहे त्याचा मला अभिमान वाटतो की माझ्या हाताखाली शिकलेले त्यावेळीचे कृष्णा महाराज मते आताचे देवगड देवस्थानचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज झाले हे भाग्य माझ्या वाट्याला आलाय त्यातच माझे सर्व सेवा सफल झाली.

सेवा करत असताना वेगवेगळे पुरस्कारांनी मला सन्मानित करण्यात आले त्यामध्ये सावित्रीबाई आदर्श शिक्षक पुरस्कार कोल्हापुर येथे देण्यात आला 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही मी प्राप्त केला 2020 मध्ये गोवा अकादमी महाराष्ट्र राज्य हिंदी भाषा रत्न पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले हे सर्व लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे उपकार आहेत.

अशी वाटचाल सुरू असतानाच संस्थेने प्रशासकीय कामाची जबाबदारी मला दिली मुलांच्या प्रगतीची व शिक्षणाची वाटचाल कशी असावी यासाठी माझ्या सहकाऱ्यांनी मला सहकार्य केले विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची आवड निर्माण व्हावी लर्निंग सुविधा सर्वांच्या सहकार्यातून उपलब्ध करून दिली कॉम्प्युटरचाही सराव करून घेतला स्पर्धा परीक्षेचा ही सराव करून घेतला दहावीच्या 95 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली विद्यार्थ्यांमध्ये श्रम, प्रतिष्ठा, सुसंस्कृतपणा , धाडसीपणा ,जिद्दपणा, वक्तशील पणा, व्यक्तिमत्व विकास, त्यामधून अनेक नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षित बनवले आजही अनेक विद्यार्थी विविध पदावर विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत आज पदावरून जाताना भावना दाटून येतात पण म्हणतात ना पिकलेल्या पानांना नवीन पालवी फुटण्यासाठी दूर व्हावी लागते म्हणजे वृक्ष डेरेदार होतो तसेच आज काहीसे झाल्यासारखे वाटते आहे.

एखादी माहेरवाशीन जसे आपल्या पित्याची अंगण सोडून जाते तसेच आज मला गहिवरून आले आहे माझ्या शिक्षण व्यवसाय क्षेत्रात मोलाची साथ माझे सासर तसेच माहेरची मंडळींची मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजते की शैक्षणिक क्षेत्रातील सर्व पदे मान-सन्मान मला मिळाला मी लोकनेते मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या रुग्णातून कधी उतराई होऊ शकत नाही शेवट बोलताना म्हणाल्या की आपण सर्व व्यस्त कामातून माझ्यासाठी वेळात वेळ काढून आला त्याबद्दल आपले सर्वांचे मी आभारी आहे पुन्हा सर्वांना त्रिवार वंदन करून माझ्या वाणीला विराम देते असे बोलताना आपले भाषण शिक्षण संस्था बद्दल ऋण श्रीमती महाजन मॅडम यांनी व्यक्त केले. त्या आपल्याच शिक्षक सेवानिवृत्ती प्रसंगी गोगलगाव येथील सुदामराव मते पाटील माध्यमिक विद्यालय मध्ये आज बोलत होत्या त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले.

या कार्यक्रम प्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र घुले पाटील, एडवोकेट देसाई आबा देशमुख,गोगलगाव सरपंच शिल्पाताई मते, दिलीपराव मते ,अनिलराव मते,राजेंद्र मते, काकासाहेब शिंदे, ह.भ.प. दिनकर महाराज मते, कल्याणराव मस्के, माजी सरपंच नाम फाउंडेशन सदस्य योगेश मस्के, जिल्हा शिक्षक भरती कार्यवाहक संजय भुसारी सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद सुदामराव मते पाटील माध्यमिक विद्यालय गोगलगाव तसेच लोकनेते मारुतराव घुले पाटील संस्था तसेच सर्व गोगलगाव ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुदामरावजी मते पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण संस्थेचे अध्यक्ष डॉ.नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांच्या शुभहस्तु करण्यात आले.

यावेळी मृदंगाचार्य सम्राट विठ्ठल बाबा गव्हाणे यांचे मृदंग वाजवण्याचा सुंदर कार्यक्रम सादर करण्यात आला त्यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हणून मान्यवरांचे स्वागत केले तसेच फटाकेचे आतिश बाजी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सूचना देशमुख सरांनी मांडली तसेच काळे सरांनी अनुमोदन दिले. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते शाळेचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील, सरस्वती मातेचे, स्वर्गीय सुदामराव मते पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब घावटे सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव गरड सर यांनी केली. यावेळी महाजन मॅडम भाषण करताना भाऊक झाल्या होत्या त्यांचे डोळे पानवले होते.

आमदार
आमदार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आमदार
आमदार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आमदार
Share the Post:
error: Content is protected !!