ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

राम

नेवासा | मकरंद देशपांडे- अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी प्रभु श्रीराम शोभा यात्रा नेवासा येथे श्रीरामनवमीच्या निमित्ताने श्रीराम राज्य उत्सव समिती नेवासा तालुका यांच्या वतीने श्रीराम नवमी च्या पुर्व संधेला सायंकाळी ६ वाजता मळगंगा देवी मंदिराच्या प्रांगणात पुष्पांनी सजविलेला भव्य रथ व त्यावर भव्य प्रभू श्रीरामचंद्र सितामाता लक्ष्मण हनुमंतराया यांच्या मूर्तीचे पूजन श्री. मधमेश्वर देवस्थानचे योगी ऋषिनाथ महाराज , यांच्या हस्ते प्रभु श्रीरामचंद्राच्या मुर्तीची वेदमंत्राच्या जयघोषात पुजा करण्यात येऊन महाआरती करण्यात आली. त्यानंतर सामुहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रभु श्रीराम भक्तांनी राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की जयघोष केला . त्यानंतर शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली. अवघी नेवासा नगरी राममय झाली होती. तर रामभक्तांसाठी साउंड सिस्टम व लाइट शो चे नियोजन देखील करण्यात आले होते .

राम

या शोभा यात्रेत महिला भगिनी यांचा उत्स्फुर्त सहभाग लक्ष्यात घेत महिलांसाठी देखील स्वतंत्र साउंड सिस्टम व लाइट शो आयोजित करण्यात आला होता. या भव्य शोभायात्रेतील श्रीराम भक्तांना डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सरबत वाटप करण्यात आले. महिला पुरुष तरुणांसह काढण्यात आलेल्या या शोभायात्रात शहरासह तालुक्यातुन हजारो श्रीराम भक्त सहभागी झाले. शोभायात्रा निमित्त भगव्या झेंडयांनी शहर खुलले होते . नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी शोभायात्रा काढण्याचा संकल्प नेवासा येथील सकल हिंदू समाज बांधवांसह युवकांनी गेल्या महिन्याभरापासून सकल हिंदू समाजातील युवक हे त्यासाठी अहोरात्र प्रयत्न केल्याने मिरवणूक भव्यदिव्य झाली सोशल मीडियाच्या माध्यमातुन प्रचार व प्रसार करण्यात आला. शहरातील मुख्य रस्त्यावर व मिरवणूक मार्गावर मोठ मोठे बॅनर भगवे झेंडे लावण्यात आले होते. मिरवणूक मार्गावर सुशोभीकरण सडा रांगोळया घालून वातावरण मंगलमय व राममय करण्यात आले व्यापारी,सुवासिनी देखील या मिरवणूकीचे स्वागत करण्यासाठी आपल्या कुटुंबासह आले होते.

वाहतुक सुरळीत ठेवण्यात आली होती. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलबुर्गे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील,उप विभागीय अधिकारी संपतराव भोसले नगर ग्रामीण पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व कर्मचारी ,१५ अधिकारी, ७३ पोलीस कर्मचारी, ३ महिला कर्मचारी, गृह रक्षक दलाचे २२ जवान गोपनीयचे अवी वैद्य, कंपनी चालक गांगुर्डे वाहतुक चे एक दंगल नियंत्रण पथक, एक एस आर पी एफ प्लाटुन, व कर्मचारी ,आर सी पी पथक असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे, मंडलाधिकारी अनिल गव्हाणे ,विज वितरण चे साहयक अभियंता वैभव कानडे व कर्मचारी उपस्थित होते. तसेच चार रुग्णवाहीका मिरवणूकीत होत्या. मिरवणूक सांगता श्रीराम मंदिर प्रांगणात करण्यात येवुन श्री मोहिनीराज मंगल कार्यालयात महाप्रसाद देण्यात आला.

प्रभु श्रीराम शोभा यात्रेत पाच देखाव्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये श्रीराम दरबार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी देखावा,श्रीराम मंदिर प्रतिकृती,संत ज्ञानेश्वर महाराज देखावा, महाकाल अघोरी असे देखावे होते.

राम

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

राम
राम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

राम