ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पाचेगाव

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील न्यू इंग्लिश स्कुल या शाळेत शैक्षणिक वर्षानिमित्त १५ जून वार शनिवार रोजी सकाळी साडे दाहाच्या सुमारास विद्यार्थ्यांचे स्वागत आणि पुस्तक वाटप कार्यक्रम गावातील मान्यवरांच्या हस्ते देऊन मोठया थाटामाटात संपन्न झाला. नवीन इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी भारत सर्व सेवा संघाचे सचिव प्रकाश जाधव,पाचेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच वामनराव तुवर, उपसरपंच ज्ञानदेव आढाव, मा.सरपंच दिगंबरब नांदे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य योगेश पवार,श्री नवघरे,तुकाराम घोगरे, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सर्व मान्यवरांनी शाळेच्या प्रथम दिवशी इयत्ता पाचवी मध्ये नवीन दाखल झालेले विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आणि पाचवी ते आठवीच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव,संजय पंढरे,संजय पवार,रमेश तूवर,बापूसाहेब जाधव,सुभाष जाधव, कावेरी मापारी,सतीश सानप, विनायक आहेर, शिवाजी बर्डे,योगिता हारदे,हरिभाऊ शिंदे, रोहन पवार, नानासाहेब जाधव,योगेश तुवर, अनिल शिंदे, मंदाकिनी तूवर, प्रकाश घोगरे व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

पाचेगाव
पाचेगाव
पाचेगाव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पाचेगाव
पाचेगाव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पाचेगाव
error: Content is protected !!