ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मोबाइल अँप

नेवासा : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे सभासद ठेवीदार व हितचिंतकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बँकेच्या मोबाइल अॅपचे उद्घाटन रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांच्या हस्ते शनिवारी (दि. २२) दुपारी चार वाजता होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष रामेश्वर चोपडे यांनी दिली.

शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य सहकार भारतीचे सचिव मधुसूदन पाटील तसेच सहकार भारतीच्या कोकण विभागाचे सहप्रमुख राजू ठाणगे व शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अँप

या मोबाइल अॅपद्वारे सभासद व सर्वसामान्य जनतेला आरटीजीएस, एनईएफटी व मनी ट्रान्ड्रॉक्शनसारखे व्यवहार करता येणार आहेत. भविष्यात भारत बिल पेमेंट सुविधेमार्फत ऑनलाइन प्रकारचे सर्वच व्यवहार या अॅपवरून होणार आहेत, अशी माहिती बँकेचे माजी अध्यक्ष संदीप मोटे यांनी दिली.

या कार्यक्रमाला बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, आघाडीचे सर्व नेते, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेच्या उपाध्यक्ष निर्गुणा बांगर, शिक्षक नेते दत्ता पाटील कुलट, राजेंद्र शिंदे, विद्युल्लता आढाव आदींनी केले आहे.

newasa news online
मोबाइल अँप
मोबाइल अँप

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मोबाइल अँप
मोबाइल अँप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मोबाइल अँप