ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

जळगाव

जळगावच्या शिरसोली रोडवरील रामदेव वाडी येथे हा भीषण अपघात घडला, अपघातातील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाहीये.

 जळगावातील रामदेव वाडी जवळ 17 दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला, मात्र असे असतानाही या अपघातातील आरोपींना अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाही. मुंबईत उपचार घेत असल्याचं कारण देत आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. विशेष म्हणजे या अपघातग्रस्त कारमध्ये गांजाच्या पुड्या आढळल्या आहेत. यातील दोघा संशयीतांचे ब्लड सॅम्पल 17 दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप मिळाले नाही. या अपघातातील आरेपीमध्ये जळगावतील मोठ्या बिल्डरचा आणि नेत्याचा मुलगा असल्याने पोलीस गप्प बसले का? अशी चर्चा जळगावात आता रंगत आहे.

जळगावच्या शिरसोली रोडवरील रामदेव वाडी येथे 17 दिवसांपूर्वी एक भीषण अपघात झाला होता. एक महिला आपली दोन मुलं आणि भाच्याला घेऊन दुचाकीवरून जात असताना एका सुसाट कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी रामदेव वाडी गावातील जमावाने अपघातग्रस्त कारमधील दोघांना बाहेर काढले. कारमधील या दोघांनीही नशा केल्याचं दिसून आलं. तर त्यांच्या गाडीत गांजाच्या पुड्या असल्याचेही पोलीस तपासात समोर आले. मात्र 17 दिवस उलटले तरी देखील अद्यापही संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीये. यामुळे आता ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.

जळगाव

आशा स्वयंसेविका राणी चव्हाण या त्यांच्या दोन मुलं आणि एक भाच्याला घेऊन घराकडे परतत असताना 7 मे रोजी भरधाव कारणे त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्या इलेक्शन ड्युटी संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये  राणी चव्हाण यांच्यासह त्यांच्या दुचाकीवर असलेल्या तीनही मुलांचा मृत्यू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार ज्या कारने धडक दिली त्या कारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याचा मुलगा होता, तर  दुसरा अभिषेक कौल नावाच्या बिल्डरचा मुलगा आहे. अपघातानंतर आरोपी ही जखमी झाले, त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान आरोपींना जेव्हा रुग्णालयात भरती केलं तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार ते दोघेही दारूच्या नशेत होते. ज्या कारणे धडक दिली त्या गाडीमध्ये गांजा ही सापडलेला आहे. मात्र 17 दिवस उलटून गेले तरीही आरोपीचे अद्याप ब्लड रिपोर्ट आलेला नाहीये. आरोपी गेल्या 17 दिवसापासून मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे ते जसे बरे झाले तसं त्यांना लगेच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मात्र या प्रकरमात महिलेचे कुटुंब आणि ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांची आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जळगाव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जळगाव
जळगाव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जळगाव
error: Content is protected !!