ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अभिषेक गाडेकर

नेवासा – अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य श्रीरामपुरच्या वतीने श्रीरामपूर येथे आयोजित राज्य स्तरीय मेळाव्यात पत्रकार अभिषेक गाडेकर यांची महाराष्ट्र राज्य लोकसभा प्रभारी अध्यक्ष श्री. अनिल ताके पाटील यांनी अहमदनगर जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती केली आहे . श्रीरामपूर येथे अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या राज्य स्तरीय नुकतेच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गाडेकर यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. महासंघाचे संस्थापक श्री.प्रल्हाद गुळभिले पाटील यांचे शुभ हस्ते तर संस्थापक सचिव श्री. जी. के. गाडेकर नाना, महिला जिल्हा अध्यक्षा सौ. नीताताई हासे आदि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितित गाडेकर यांना सदर निवडणुकीचे पत्र देण्यात आले.

अभिषेक गाडेकर

या निवडीनंतर अभिषेक गाडेकर म्हणाले की, आपण या पदाच्या माध्यमातुन मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी व उपेक्षित मराठा समाजाला न्याय मिळून देण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातुन प्रयत्न करणार आहे. अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या अहमदनगर जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी अभिषेक गाडेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे महासंघाचे महाराष्ट्र राज्य लोकसभा प्रभारी अध्यक्ष श्री. अनिल ताके पाटील, नेवासा तालुका अध्यक्ष भारत बेल्हेकर,महिला आघाडी तालुका अध्यक्षा निलिमा वाबळे, शहर अध्यक्षा जयश्री शिंदे,लिलाताई मारकळी, उषाताई मारकळी माऊली डिजिटलचे नितीन धस सर यांनी अभिनंदन केले आहे.

अभिषेक गाडेकर
अभिषेक गाडेकर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अभिषेक गाडेकर
अभिषेक गाडेकर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अभिषेक गाडेकर
error: Content is protected !!