ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

महाराज

नेवासा – नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथील ज्योतिषशास्त्र तज्ञ व हनुमान भक्त बालब्रम्हचारी हभप बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांचा धर्म कार्याच्या उत्कृष्ट धर्म प्रचार जनजागृती कार्याबद्दल आरडगाव येथील भक्त मंडळाच्या वतीने सत्काराच्याद्वारे गौरव करण्यात आला. नगर तालुक्यातील श्री क्षेत्र स्वयंभू जागृत देवस्थान आगडगाव येथील काल भैरवनाथ देवस्थान प्रांगणात सुमारे सतरा हजार भाविकांना आमरस भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराज

याप्रसंगी बालब्रम्हचारी बाळकृष्ण महाराज यांनी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदमंत्राच्या जयघोषात करून उपस्थित हजारो भाविकांना मंत्रमुग्ध केले होते.त्यांच्या या धार्मिक कार्याच्या योगदानाबद्दल श्री कालभैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष भीमभाऊ कराळे यांच्या हस्ते व विश्वस्त मंडळीच्या उपस्थितीत बाळकृष्ण महाराज यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजेने श्री वज्रेश्वरी माता व कालभैरवनाथांना आमरसासह मिष्टान्न पदार्थांचा नैवेद्यद्वारे भोग देण्यात आला.यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी आमरसासह मिष्टान्न भोजन देण्यात आले.

महाराज
महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराज
महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराज
error: Content is protected !!