ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

स्कॉच

नेवासा – मिञ मंडळींवर सततच ‘वॉच’ ठेवून स्कॉच पिण्यास सोकलेल्या आणि स्वता:ला प्रतिष्ठीत समजणाऱ्या तळीरामावर त्याने ढोसलेल्या स्कॉचचे बिल मिञांनी न दिल्यामुळे नशेची झिंग चढलेल्या या नशेखोराने एका हॉटेलात चांगलाच राडा केल्याची घटना अ.नगर – छञपती संभाजीनगर महामार्गावरील एका हॉटेलात घडली त्यामुळे वॉच ठेवून स्कॉच पिण्याची नेहमीची सवय आणि छञी करणाऱ्याचा मोह चांगलाच अंगावर आल्याचा प्रसंग घडल्यामुळे या तळीरामाला पश्चाताप करण्याची वेळ आली.

नेहमीच मिञांशी वॉच ठेवून स्कॉच पिण्याची सवय या नशाखोराला चांगलीच जडलेली होती मोठ – मोठ्या गप्पा आणि आपली अर्थिक कमाईची फुशारक्या मारण्याची गंमतीमुळे टेबलवर बसलेल्या मिञांची दारु या नशाखोरांमुळे याच्या गप्पा सुरु झाल्या की, उतरत होती माञ काल नेहमीचे आपल्या सवंगड्यांनी त्याला कॉल न करता नेहमी प्रमाणे हॉटेला जात जावून बसलेले होते वॉच ठेवणाऱ्यांची नजर नेहमी प्रमाणे या स्कॉचवाल्याची होती पण दररोजच खर्च करुन फुकटात बढाया ऐकण्यास वैतागलेल्या मिञांनी त्याला थर्ड मारत दैनंदिन सांयकाळचा प्रोग्रॅम सुरु केला आणि त्यांच्या टेबलवर गप्पा रंगलेल्या असतांनी पुन्हा हा छञी बहाद्दर त्यांच्या जवळ येवून बसला नमस्कार चमत्कार झाला पण त्याला कोणीची काही सांगेना म्हणून त्यानेच स्कॉचची ऑर्डर केली अन् ढोसलेल्या बाटलीचे पैसे त्याच्या मिञांनी न दिल्यामुळे या तळीरामाचा राग चांगलाच अंगलट आल्याची जोरदार चर्चा राञी जोरदारपणे रंगली होती.

स्कॉच
स्कॉच
स्कॉच

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्कॉच
स्कॉच

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्कॉच
error: Content is protected !!