ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शवंतरावजी गडाख

जिल्ह्याच्या राजकारणातील, विशेषता सहकार क्षेत्रातील एक विशाल ग्रंथ, आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या उत्तुंग विचारांचा वारसा लाभलेले , सर्वसामान्यांच्या सुखदुःखाची निरपेक्षपणे जाण ठेवणारे ,यशवंतराव चव्हाणांना आपले गुरु मानणारे मी तेवढा स्नेह स्वर्गवासी वसंतदादा पाटील व इतर अनेक समकालीनांशी असलेले, जिल्ह्यातील बदलाचे एक शिल्पकार आदरणीय यशवंतरावजी गडाख साहेब…

सन १९८२ – ८3 पासून साहेबांना आम्ही बघत आलोय,ज्या सहजतेने व आत्मियतेने राजकारणात वावर, तितकाच समाजकारणात , साहित्यात. मुळा एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक विकासावर लक्ष, कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आदरणीय साहेबांनी कर्मचारी व सामान्यावर स्नेह केला . अफाट -अचाट अशी स्मरणशक्ती, जणू एक दैवी वरदानच . सुख -दुःखाची जाण असणारे, वरवर बघता अतिशय कडक स्वभावाचे वाटणारे साहेब अतिशय स्नेहाद्र आहेत.माझ्यासारख्या अनेकांची आयुष्य साहेबांनी घडवले , त्यांचे स्थान नेहमी पितृवत राहिले व राहील.

अनेकांच्या मनाच्या कोपऱ्यात साहेबांसाठी आदराचे ‘देवघर’ आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन, नेतृत्वगुण लाभलेल्या साहेबांनी आपल्या राजकारणाची सुरुवात पंचायत समिती जिल्हा परिषदेपासून केली. व्यक्ती -व्यक्तिशी संपर्क, त्यासाठी मतदारसंघाच्या – कानाकोपऱ्यात साधनं असो नसो पण संपर्क केला. सह्याद्रीला पान्हा फोडणारे कष्ट करत सर्वांच्या सहकार्याने मुळा सहकारी साखर कारखाना सुरू केला.

शवंतरावजी गडाख

बाहेर जाणाऱ्या उसाची व शेतकऱ्यांची फरपट या देव माणसाने थांबवली. शिक्षणाची गंगा आपल्या भगीरथ प्रयत्नांनी या परिसरात आणून शिक्षणासाठी बाहेर जाणारे, हाल अपेष्टा सहन करत डबे न मिळाल्यास दोन-दोन दिवस उपाशी राहत शिक्षण घेणारे,गोरगरिबांना बाहेर जाऊन राहणे शिक्षण घेणे त्या काळातही परवडणारी बाब नव्हती. अशा ज्ञानतृषार्तांच्या शिक्षणाची व्यवस्था या भगीरथाने परिसरात केली. जोडीला सहउद्योग निर्माण झाले. अनेक प्रपंच मार्गी लागले .आर्थिक दृष्ट्या स्वावलंब मिळाले, परिसरातील बाजारपेठा शिक्षणाच्या व्यवस्थेमुळे फुलून गेल्या. परिसर,तालुका , जिल्हा आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला.
समाजकारणी म्हणून साहेबांची भूमिका सदैव यशस्वी राहिली.

राजकारण व समाजकारणाची गल्लत साहेबांनी कधी होऊ दिली नाही .पर्यावरण प्रेमी म्हणून त्यांनी स्वतः व त्यांच्या प्रेरणेने परिसरातील लोकांनी उच्चांकी वृक्षारोपण केलेले आहे .आपल्या सर्व भूमिकांना न्याय देणारे, सतत दुसऱ्याचा विचार करणारे, समाजासाठी समर्पणास सदैव तयार असलेले व्यक्तीमत्व , दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होणारे, सुखात सुखी वाटणारे , लहानशा गुणांचे कौतुक करणारे, मदतीचा – आशिर्वादाचा हात सदैव देणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व ,साहित्य क्षेत्रातही त्याच क्षमतेने साहेब वावरले. नगरचे साहित्य संमेलन हा एक मानाचा तुरा..सोनई परिसराला आदरणीय साहेबांच्या मुळे मोठ-मोठे थोर साहित्यिक, समाजसेवक , राजकारणी, विद्वत जणांचा सहवास मिळाला – मिळतोय.या लोकांना बघण्याचे भाग्य परिसरातील लोकांना मिळाले.साहेब जेवढ्या हळव्या मनाचे तितकेच कर्तव्य कठोर वाटतात.

त्यांनी उभारलेला मुळा उद्योग समूह याची साक्ष देतो.आदरणीय साहेब म्हणजे जन-मानसाच्या मनाचा अभ्यास असलेले विद्यापीठ होय.साहेबांचे जीवन प्रचंड संघर्षात गेले,आनंदाच्या झुळुकीबरोबर दुःखाचा प्रपात आला असेल परंतु हिमालयासारखे स्तब्ध रहात निश्चल पणे साहेबांनी तोंड दिले. परिसस्पर्शी असलेले साहेब सर्व क्षेत्रात यश मिळवत आहेत.
संपूर्ण आकाश आपण कोणत्याही परिस्थितीत बघू शकत नाही, उंचच उंच पर्वतावर जाऊन बघितले तर मोठा गोल दिसतो, ते पूर्ण आकाश नसतेच . खिडकीतून बघितले तर छोटा तुकडा दिसतो. आदरणीय साहेबांचे कार्य आभाळासारखे आहे.

आकलनाच्या पलीकडचे, समाजासाठी निस्वार्थपणे राजकारणात आलेले साहेब त्यांच्या कार्याला शब्दात बांधता येत नाही . साहेबांनीही आपल्या कामाचा गवगवा केला नाही, परंतु राजकीय – सामाजिक क्षेत्रात आधारवड असलेल्या या देव माणसाची दखल पाहिजे तेवढ्या प्रमाणात घेतली गेली नाही याची खंत सामान्यांच्या मनात नेहमीच आहे.
आदरणीय साहेबांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
प्राचार्या इंदुमती खंडागळे सोनई, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

शवंतरावजी गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शवंतरावजी गडाख
शवंतरावजी गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शवंतरावजी गडाख
error: Content is protected !!