ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Monsoon

Monsoon Update 2024 : केरळनंतर मान्सून तामिळनाडूत दाखल झाला असून बिहारमध्ये धडकण्याच्या तयारीत आहे. पुढील 24 तासांत केरळमध्ये मुसळधार ते अति मुसळधार आणि अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Monsoon Update 2024 : उन्हाच्या झळांनी त्रस्त नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. उत्तर भारतात सध्या तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे, असं असताना दक्षिण भारतात मात्र मान्सूनची चाहूल लागली (Monsoon News) आहे. केरळमध्ये (Kerala) दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाल्याची सुखवार्ता याआधीच हवामान खात्याने (IMD) दिली आहे. केरळनंतर आता मान्सून तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) दाखल झाल्याची माहिती आयएमडीने दिली आहे.

केरळनंतर तामिळनाडूत धडकला मान्सून

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, केरळमध्ये 30 मे रोजीच मान्सून धडकला. साधारणपणे 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो, पण यंदा मान्सून दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनचे ढग 15 जूनला मध्य प्रदेशात दाखल होऊ शकतात. 20 जूनपर्यंत मान्सून उत्तर प्रदेशात पोहोचेल. केरळनंतर मान्सून तामिळनाडूत दाखल झाला आहे. केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचा जोर वाढला आहे. मान्सूनमुळे केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. 

केरळमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता

येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 24 तासांत केरळमध्ये मुसळधार ते अति मुसळधार आणि अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोझिकोडच्या उरुमीमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. तेथे 14 सेमी पावसाची नोंद झाली. मान्सून सध्या पूर्वोत्तर दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

आता मान्सून बिहारमध्ये दाखल होण्याच्या तयारीत

भारताच्या ईशान्येकडील राज्यांमधून पुढे सरकणारा मान्सून पश्चिम बंगालमध्ये पोहोचला आहे. यानंतर आता मान्सून बिहारमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आतापर्यंत ते अंदमान-निकोबार बेटे, केरळ, लक्षद्वीप आणि तामिळनाडूमध्ये मान्सून पोहोचला आहे. मान्सून कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशात 5 जूनला पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 10 जून रोजी मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहोचेल. मान्सून 15 जूनला मध्य प्रदेशात दाखल होऊ शकतो. 20 जूनपर्यंत मान्सून उत्तर प्रदेशात पोहोचेल. 

या भागात अतिवृष्टीचा अंदाज

आयएमडीच्या अंदाजानुसार, 2 जून रोजी उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 1 आणि 2 जून 2024 रोजी केरळ आणि माहेमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. 2 आणि 3 जून 2024 रोजी अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस, तर काही भागात अति अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

Monsoon

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Monsoon
Monsoon

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Monsoon
error: Content is protected !!