ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भाऊसाहेब वाकचौरे

होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या नेवासा तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी तालुक्यामध्ये चांगलाच कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी वरती जोर दिल्याचे पहावयास मिळत आहे.आज शिरसगाव येथे शंकरराव गडाख यांचे कट्टर समर्थक असलेले विठ्ठलराव नाबदे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीचे तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिरसगाव येथे येऊन कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेऊन प्रश्न समजून घेतले ते म्हणाले की आपल्याला मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचवायचे आहे व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करायचे आहे.

भाऊसाहेब वाकचौरे

ते पुढे बोलताना म्हणाले की निवडून आल्यानंतर तालुक्यातील प्रश्न मी पूर्णतः सोडवणार असून तळागाळातील कार्यकर्त्यांचीही प्रश्न सोडवणार असून शेतकरी, कामगार ,मजूर, सर्व क्षेत्रातील लोकांना न्याय देण्याचं काम मी करेल असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की येत्या 13 तारखेला मशाल चिन्ह समोर बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या व एक काम करण्याची संधी द्या. ते शिरसगाव येथे नामदार शंकरराव गडाख यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले विठ्ठलराव नाबदे यांच्या निवासस्थानी बोलत होते.

या कार्यक्रम प्रसंगी प्रवीण गडाख , महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे , नानाभाऊ नवथर, कडूबाळ पाटील कर्डिले, शिरसगावचे माजी सरपंच विठ्ठलराव नाबदे,गणेश ढोकणे,सुभाषराव नाबदे ,फक्कडराव देशमुख,रोहिदास लंघे,दिगंबर देशमुख, प्रवीण घुले, रामभाऊ लंघे, सुरेश गायकवाड, मुरलीधर देशमुख, बाबासाहेब हाडोळे , गणेश देशमुख, नितीन देशमुख ,लखन देशमुख आदी शिरसगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाऊसाहेब वाकचौरे
भाऊसाहेब वाकचौरे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भाऊसाहेब वाकचौरे
भाऊसाहेब वाकचौरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भाऊसाहेब वाकचौरे
Share the Post:
error: Content is protected !!