ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पारायण

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सतोबावाडी येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. दि. २३ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत हा सप्ताह होणार आहे. यामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन होईल. रोज पहाटे ५ ते ६ काकडा भजन, ७ ते ११ सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ६.३० ते ८.३० किर्तन सोहळा व नंतर भोजनाचा कार्यक्रम होईल.

दि. २३ एप्रिल रोजी ह. भ. प. प्रांजल ताई पानसरे (जुन्नर),दि. २४ एप्रिल रोजी ह. भ. प. रामराव महाराज ढोक( नागपूर),दि. २५ एप्रिल रोजी ह. भ. प. विष्णू महाराज केंद्रे (आळंदी देवाची) , दि २६ एप्रिल रोजी ह. भ. प. तेजश्री ताई नवले( कात्रड) , दि. २७ एप्रिल रोजी स्वामी अद्वैतानंद सरस्वती शास्त्री( भिलवडे ) , दि. २८ एप्रिल रोजी ह. भ. प. नितीन महाराज भोसले (कोपरगाव), दि. २९ एप्रिल रोजी ह. भ. प. पांडुरंग गिरी वावीकर,दि.३० एप्रिल रोजी सकाळी ग्रंथ मिरवणूक होऊन ९ ते ११ ह. भ. प. प्रकाशानंदगिरी महाराज (देवगड) यांचे काल्याचे किर्तन होईल व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाने या सप्ताहाची सांगता होईल. तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे ग्रामस्थांच्या वतीने कळविण्यात येत आहे.

पारायण
पारायण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पारायण
पारायण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पारायण
error: Content is protected !!