ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रास्ता रोको


नेवासा- भंडारदरा धरणाच्या चालू आवर्तनात पाट चाऱ्यांतून उच्च दाबाने पूर्ण क्षमतेने पाट पाणी वितरण होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी वंचित राहण्याचा धोका संभवत असल्याने नेवासा – श्रीरामपूर मार्गावरील बेलपिंपळगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बेलपिंपळगावचे सरपंच कृष्णा शिंदे, मा सरपंच चंद्रशेखर गटकळ,प स सदस्य रवींद्र शेरकर,अशोक संचालक अमोल कोकणे,बाळासाहेब शिंदे,वसंत कांगुणे, भीमराज साठे, पोपट सरोदे,निवृत्ती सुरसे,रजनीकांत सरोदे यांनी ग्रामस्थांनी पाटबंधारे प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भंडारदरा धरणाचा टेलचा भाग असलेल्या बेलपिंपळगाव परिसरात सुरू असलेले सध्याचे आवर्तन अत्यंत कमी दाबाने सोडण्यात आले आहे. पाटचाऱ्या पूर्ण क्षमतेने वाहत नसल्याने शेतकऱ्यांना पाट पाणी मिळण्यात असंख्य अडचणी निर्माण झाल्या असल्याकडे त्यांनी निवेदनाद्वारे संबंधितांचे लक्ष वेधले आहे. पाटचाऱ्यांना पूर्ण दाबाने पाणी सोडले जात नसल्याने शेतकऱ्यांना भरणे उरकण्यात अडथळे येत असल्याचे नमूद करून अशीच अवस्था राहिल्यास या परिसरातील मोठ्या प्रमाणावरील शेतकरी या दुष्काळजन्य परिस्थितीत पाट पाण्यापासून वंचित राहण्याचा धोका यात विषद करण्यात आला आहे.

रास्ता रोको

यासंदर्भात वेळोवेळी संबंधितांना सूचित करूनही त्यांच्याकडून याबाबत गांभीर्याने कार्यवाही केली जात नसल्याची खंत बेलपिंपळगाव ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या पाटपाण्यापासून वंचित राहिल्यास या परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहणार असल्याने तसेच पाळीव गोधनाच्या चारा पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहणार असल्याने पाट चाऱ्यांतून पूर्ण दाबाने व क्षमतेने पाटपाणी सोडण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात पाटबंधारे प्रशासनाने टाळाटाळ केल्यास गावातील पुरुष, महिला, तरुण, वयोवृध्द, बालके तसेच पाळीव जनावरांना घेऊन नेवासा – श्रीरामपूर राज्य मार्गावरील बेलपिंपळगाव फाटा येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

newasa news online
रास्ता रोको

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रास्ता रोको
रास्ता रोको

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रास्ता रोको
error: Content is protected !!