ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

घोडेगाव

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव सध्या अवैध धंद्यांचे माहेरघर बनले आहे. नगर संभाजी नगर रोडवर असलेले हे गाव या गावाला कांदा मार्केट व जनावरांचा असा मोठा वारसा असलेला बाजार देखील या ठिकाणी आहे. या भागात राज रोस पणे चौका चौकात गावठी दारू विक्री केंद्र, मटका, जुगार, त्याचप्रमाणे गावठी कट्यांची देखील या ठिकाणी विक्री सुरू असते. बाजारात आल्यावर आपले वाहन पार्कींग मध्ये लावुन सुध्दा ते सुरक्षित राहील की नाही याची शाश्वती देणे देखील नाही. या पुर्वी देखील दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. परंतु पोलीसांत जाऊन काही उपयोग नाही.

पोलीस यंत्रणा च यांना मिलेभगत असल्याने याचा तपास लागत नसल्याने नको तो डोक्याला ताप म्हणून फिर्याद देण्यासाठी कुणी धजत नाही. तसा विचार केला तर घोडेगाव साठी स्वतंत्र पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली मात्र या चौकीचा कारभार सध्या झिरो पोलिसांच्या हाती असून त्यामुळे अवैध्य व्यवसाय बोकाळले आहे पांढरी पुल ते घोडेगाव दरम्यान दिवसा दुचाकी तर रात्री मोठ मोठ्या गाड्या गावठी कट्यांचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकार देखील सध्या राज रोज पणे सुरू आहे. पांढरी पुल येथे अनेक हाॅटेल वर वेश्याव्यवसाय,गाड्यातील डिझेल चोर, सिमेंट चोर, लोखंडी सळाया या ना सारखे अनेक प्रकार या ठिकाणी घडत असतात.

या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी या ठिकाणी पोलीस चौकीची उभारणी केली खरी परंतु एकही पोलीस या चौकीत उपस्थित नसल्याने तक्रारदाराला तक्रार देण्यासाठी थेट दहा किलोमीटर सोनई या ठिकाणी यावे लागते. त्यातच येऊन आपल्याला न्याय मिळेल किंवा नाही याची खात्री नाही. शुक्रवार जनावरांचा मोठा बाजार असल्याने या ठिकाणी परराज्यातून व्यापारी येत असतात. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते . या कोंडींचे पोलीसांना काही सोयरसुतक नाही. झिरो पोलिसाच्या मदतीने वाहने अडवून त्यांचेकडुन चिरीमिरी वसुली होत असल्याचे देखील दिसून आले आहे . या सर्वासाठी संबधित पोलीस यंत्रणाच व या ठिकाणी असलेले बिट अंमलदार च जबाबदार आहेत.

वेळीच पोलीस खाक्या दाखवला तर या सर्वांना आळा बसेल. मात्र तसे होतांना दिसत नाही.या सर्वांवर तात्पुरती किरकोळ कारवाई करत आरोपींना सोडून देण्यात येते. तरी वरिष्ठांनी या मध्ये लक्ष घालण्याची नितांत गरज आहे. रात्रीच्या वेळी घोडेगाव ते पंढरपूर दरम्यान व घोडेगाव ते नेवासा फाटा दरम्यान अनेक हॉटेल आहेत परंतु या हॉटेलमधून काय व्यवसाय चालत असतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही याला पोलीस यंत्रणेचाच छुपा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे देशी विदेशी दारूचा महापूर आलेला दिसून येतो पोलीस हे शोभेचे बाहुले बनले असल्याने सामान्य माणसाने मागायचा तरी कोणाकडे..

घोडेगाव
घोडेगाव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

घोडेगाव
घोडेगाव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

घोडेगाव
error: Content is protected !!