ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सायकल

नेवासा- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा पंचायत समिती समाज कल्याण विभाग व तेलकूडगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संघटक नरेंद्र घोडेचोर यांच्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्यामुळे गरजू मुलींना दोन सायकलींचे नुकतेच वाटप करण्यात आले.
पंचायत समिती समाज कल्याण विभागाकडून सायकल प्रशिक्षण योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यशासनाने राज्यातील ग्रामीण भागातील शाळकरी मुलींना आर्थिक सहाय्य (अनुदान) देण्याचा निर्णय घेतलेला होता राज्य सरकारच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता १२वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल उपलब्ध करून दिली जाते.

दुर्गम भागात जिथे योग्य रस्ते नाहीत आणि वाहतुकीची पुरेशी साधने नाहीत तिथे विद्यार्थीनींना शाळेतून घरी ये-जा करण्यासाठी आजही प्रवासखर्च व पालक-विद्यार्थीनीची मानसिकता,पायी येताना-जाताना टारगटांचा त्रास आदी बाबींमुळे, तसेच राज्यातील ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली आपले जीवन व्यतीत करत असल्यामुळे, सदर कुटुंबातील मुली शिक्षणापासून वंचित राहत होत्या. शासनाकडून यासाठी सायकल वाटप योजना सुरू करण्यात आली त्यामुळे १२वी पर्यंत च्या गरजू मुलींना सायकल खरेदी साठी पंचायत समितीमार्फत ५०००रु अथवा सायकल उपलब्ध करून दिली जाते.यासाठी पाठपुरावा करणेही महत्त्वाचे असते.

मनसेचे तालुका संघटक नरेंद्र घोडेचोर यांनी पाठपुरावा करून दोन हुशार व गरजू मुलींना सायकल उपलब्ध करून दिल्याने त्यांचे परीसरातुन कौतुक होत आहे.
.यावेळी बोलताना, नरेंद्र घोडेचोर म्हणाले की,सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू मुलींना सायकल आज उपलब्ध करून दिल्या,भविष्यातही पक्षाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.यावेळी लाभार्थी विद्यार्थीनी विद्या जगन्नाथ सरोदे,प्रमिला बंडू साळवे समवेत पालक व ग्रामस्थही उपस्थित होते.

newasa news online
सायकल

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सायकल
सायकल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सायकल
error: Content is protected !!