ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शनि

शनिशिंगणापूर : नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे भाविकाने दिलेल्या दानातून ६१ लाखांचा चौथरा तयार करण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

शिंगणापूर येथे ४०० वर्षांपासून शनिमूर्ती चौथऱ्यावर विराजमान आहे. शनिमूर्तीचा चौथरा आकर्षक असावा, यासाठी एका भक्ताने देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडे याविषयीची संकल्पना मांडली. त्यास विश्वस्त मंडळाने मान्यता दिली. त्यानंतर कर्नाटक राज्यातील हुबळी येथे चार महिने दगड, ग्रॅनाईट व रेड आग्रा फरशी घडविण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

शनि

चौथाऱ्यासाठी लागणारा काळा ग्रॅनाईट तामिळनाडू राज्यातून मागविण्यात आला आहे. सध्याचा १८ बाय १८ असलेला चौथरा आता २१ बाय २१ आकारात होणार आहे. सध्या जुन्या चौथऱ्याच्या बाजुला खोदकामास सुरुवात केली असून नंतर जुन्या चौथऱ्याचे ग्रॅनाईट काढून जमिनीच्या लेवलवर काँक्रीट केले जाऊन त्यानंतर यावर शिल्पकला बसविण्यात येणार आहे. कर्नाटकी कोरीव नक्षीदार शिल्पकला असलेला चौथरा भाविकांना काही दिवसांत पाहायला मिळणार आहे.

शनि
शनि

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शनि
शनि

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शनि
error: Content is protected !!