ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पोलीस

नेवासा – शहरात एका महिलेचा विनयभंग करुन तिला व तिच्या कुटूंबियांना मारहाण केल्याची घटना घडली आहे याबाबत दाखल फिर्यादीवरुन ९ जणांवर अॅट्रॉसिटी, मारहाण, दंगलीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादीत म्हटले,की, अजीज ऊर्फ कालु शेख रा. गंगानगर नेवासा खुर्द याने माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून अंगावरील कपडे फाडुन विनयभंग केला. त्याचा मित्र तालीफ व अनोळखी या दोघांनी खाली पाडुन लाथाबुक्क्यांनी तसेच महिलेची आई हिला अजीज ऊर्फ काळु शेख याचे आई व बहिण यांनी मारहाण करुन शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली.

तसेच जातीवाचक बोलला तसेच अजीज ऊर्फ कालु शेख याचा भाचा सद्दाम व त्याचेसोबतचे अनोळखी दोन जणांनी मोटारसायकलवर येवून मारहाण केली. पतीच्या पाठीमागे विट घेवुन पाठलाग केला. दगडफेक केली. अजीज ऊर्फ कालु शेख, त्याची आई, बहिण व त्याचे मित्र तालीफ (पूर्ण नाव माहिती नाही), त्याचा भाचा सद्दाम (पूर्ण नाव माहिती नाही) व तीन अनोळखी यांच्याविरुध्द कायदेशीर फिर्याद आहे.

या फिर्यादीवरुन वरील सर्वांवर विनयभंग, मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आदी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

newasa news online
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा
error: Content is protected !!