ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अहिल्यादेवी

गणेशवाडी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ट्रस्ट सोनई व सोन‌ई ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या वतीने रविवारी दि 7रोजी सोनई येथील अहिल्यादेवी मंदिराच्या सभा मंडपामध्ये सेवानिवृत्त झाल्याबद्दल श्री शनैश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनई या विदयालयाचे प्राचार्य भिमराज खोसे व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय प्रवरानगर लोणी येथील पर्यावरणशास्त्र विभागांचे प्रा डॉ गोरक्षनाथ पोधे हे प्रदीर्घ कालावधीनंतर सेवानिवृत्त झाल्या बद्दल त्याचा सन्मान करण्यात आला

अहिल्यादेवी

तसेच महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरेगाव या विद्यालयात लहानू ढाले सर यांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्याचबरोबर यमुनाबाई इखे याची सोनई येथील ताई साहेब कदम कन्या विदयामदीर सोनई येथे मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्याबद्दल तसेच मल्हार सेनेच्या तालुकाध्यक्षपदी सुनील तागड यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते देण्यात आले त्यांचाही सन्मान सोनई ग्रामस्थ ग्रामपंचायत सोनई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ट्रस्ट सोनई व यशोदीप नागरी व्यापारी पतसंस्था तसेच व्यापारी असोसिएशनच्या वतीने वरील मान्यवरांचा सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते .

अहिल्यादेवी

या कार्यक्रमासाठी जय मल्हार सेनेचे प्रदेशाध्यक्ष लहुजी शेवाळे, कृष्णाजी होळकर ज्येष्ठ नेते, प्रदीप राज भोंडे, सौ मीनाताई राहीज मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. सोमनाथ गांगले आदी मान्यवराच्या हस्ते वरील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मण बारगळ, सचिव शहादु राशिनकर, मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक कारभारी डफाळ, मुरलीधर राशिनकर, मोहनराव तोगे, प्रा लक्ष्मणराव पोंधे, वसंत बारगळ, सुनील तागड, सोनई ग्रामपंचायत सदस्य जयश्री तागड, उषा पोंधे, ज्ञानेश्वर गावडे व धनगर समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.सखाराम राशिनकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप तोगे यांनी केले.

अहिल्यादेवी
अहिल्यादेवी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अहिल्यादेवी
अहिल्यादेवी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अहिल्यादेवी
error: Content is protected !!