ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दिंडी

नेवासा – गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज तसेच ह .भ ‌.प गाथा मूर्ती रामभाऊ महाराज राऊत गंगापूर तसेच ह. भ. प. भागवताचार्य सोमनाथ महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मीती ज्येष्ठ 12/13 बुधवार दिनांक 3/7 / 2024 रोजी आषाढी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान श्रीक्षेत्र भीमाशंकर संस्थान भिवधानोरा ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी होणार आहे. हा दिंडी सोहळ्यात परिसरातील सर्व भाविक भक्तांनी सहभागी होऊन दिंडी सोहळ्याच्या आनंद घ्यावा असे आव्हान ह. भ. प भागवताचार्य सोमनाथ महाराज पाटील यांनी केले आहे. दिनांक 3/72024 रोजी या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान श्रीक्षेत्र भीमाशंकर संस्थान भिवधानोरा येथून होणार आहे या दिंडीचे रोजचे वेळापत्रक दिंडी पोम्प्लेट पत्रिका वरती दिलेली आहे.

या दिंडीचे विणेकरी म्हणून ह. भ .प जनार्दन साहेबराव चव्हाण, तसेच ह. भ. प. शेषराव माधवराव चव्हाण, तसेच दिंडीतील कीर्तनकार मंडळी म्हणून ह .भ. प वैभव महाराज काळे ह.भ.प चांगदेव महाराज काळे ,ह .भ. प ज्ञानेश्वरी ताई गुंजाळ, हे असणार आहेत तसेच एकादशीची कीर्तन सेवा ह .भ. प अशोक महाराज इदगे आळंदी देवाची यांचे असणार आहे.

तसेच दिंडी काळामध्ये मृदंगाचार्य म्हणून ह. भ. प ऋषिकेश महाराज पटांगरे ,ह .भ .प उत्तम महाराज माऊली राजुर गणपती, तसेच गायनाचार्य समस्त गुणी जन भजनी मंडळ व समस्त महिला भजनी मंडळ हे असणार आहेत, हार्मोनियम वादक म्हणून ह .भ .प श्री गणेश महाराज खाटीक तसेच आरोग्यसेवा डॉक्टर श्री जी .व्ही. सोमवंशी डॉक्टर ,श्री रवींद्र साबळे डॉक्टर श्री किशोर राऊत यांनी दिली आहे, तसेच दिंडी काळामध्ये सुरक्षारक्षक म्हणून श्री जनार्दन काळे दादासाहेब लोखंडे मधुकर भाऊसाहेब चव्हाण हे असणार आहेत, तसेच रथचालक म्हणून नवनाथ गंगाधर चव्हाण, रथाची व्यवस्था श्री सदाशिव गाडेकर यांनी केली आहे तसेच वाहनाची व्यवस्था श्री तुकाराम लक्ष्मण शेळके यांनी केली आहे तसेच पाणी टँकर व्यवस्था श्री मारुती आसाराम झिंजुर्डे, तसेच टँकर चालक म्हणून विठ्ठल तुकाराम फुले ,साऊंड सिस्टीम भगत साऊंड सिस्टिम शेंडी, तसेच अनेक गावातील भजनी मंडळ समस्त भजनी मंडळ या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे त्यात भिवधानोरा, पाथरवाला, पखोरा ,गळलिंब ,आगरवाडगाव हे असणार आहेत.

दिंडी

तसेच विशेष सहकार्य म्हणून आमदार प्रशांत बंब, रमेश काका निरपळ जिल्हा परिषद सदस्य, सुमित भाऊ मुंदडा पंचायत समिती सभापती गंगापूर, दादा पाटील चव्हाण अध्यक्ष भीमाशंकर संस्थान ,श्री काशिनाथ रंगनाथ गाडेकर ,रामभाऊ मसु लांडे पांडुरंग गंगाधर चव्हाण, पांडुरंग भाऊराव चव्हाण, निवृत्ती काक खैरे सर्व मान्यवर सदस्य यांचे दिंडीला विशेष सहकार्य लाभणार आहे.

तसेच दिंडीची नियमावली पुढील प्रमाणे असणार आहे……

  1. दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनी बीसी पोटी फक्त 701 रुपये सोबत आणावेत
  2. प्रत्येक वारकऱ्याने पांढरा पोशाख टोपी ताठ तांब्या अंथरून पांघरून बॅटरी गोळ्या औषधे सोबत आणावीत
  3. दिंडीमध्ये गैरवर्तन केल्यास दिंडी मधून बाहेर काढण्यात येईल
  4. जीवित वित्तहानी दिंडी चालक व कमिटी जबाबदार राहणार नाही.
  5. वेळप्रसंगी नियोजनात बदल झाल्यास सहकार्याची भावना ठेवावी.
  6. वेळप्रसंगी नियोजनात बदल करण्याचा अधिकार दिंडी चालकास राहील याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी दिंडीमध्ये सहभागी होणारे गावे आगरवाडगाव ,गळलिंब ,पखोरा ,धनगर पट्टी ,भेंडाळा ,पुर ,खेडले का, पाथरवाला ,पिंपळगाव ,तेलकुडगाव, लखमापूर आदी गावांचा यामध्ये समावेश आहे.
    तसेच जास्तीत जास्त भाविकांनी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन दिंडी चालक ह .भ .प भागवताचार्य सोमनाथ महाराज पाटील यांनी केले आहे.
दिंडी
newasa news online
दिंडी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दिंडी
दिंडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दिंडी
error: Content is protected !!