ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ज्ञानेश्वरी

नेवासा – यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक जेष्ठ साहित्यीक यशवंतराव गडाख यांच्या संकल्पनेनुसार व माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी दिलेल्या योगदानामुळे  संत ज्ञानेश्वर माऊली भक्तांनी हस्तलिखित केलेल्या बाराशे बारा ज्ञानेश्वरीचे ग्रंथांचे पूजन व प्रकाशन देवगडचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहणाऱ्यांच्या जीवनात बदल नक्कीच होणार आहे असा संदेश त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या सभामंडपात झालेल्या हस्तलिखित ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पूजन प्रसंगी गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.तर आळंदी येथील हभप मीराबाई महाराज मिरीकर,सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत हभप श्री उद्धवजी महाराज मंडलिक, देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग,विश्वस्त विश्वासराव गडाख,माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, नंदकिशोर महाराज खरात,अँड.देसाई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत माऊली भक्तांनी हस्तलिखित केलेल्या १२१२ हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथांतील अगोदर बाराव्या अध्यायाचे पारायण करून पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने  गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या “पैस”खांबाचे दर्शन घेतले.यावेळी गुरुवर्य बाबांच्या  हस्ते मुख्य कार्यालयासह ब्रम्हलिन गुरुवर्य हभप बन्सी महाराज तांबे यांच्या वस्तूसंग्रहालय,अजानवृक्ष वालकंपाउंडचे उदघाटन करण्यात आले.त्यानंतर सभामंडपात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी  हस्तलिखित ज्ञानेश्वरीचे पूजन करून प्रकाशन करण्यात आले.यावेळी उपस्थित संत महंतांचे पूजन संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या  वतीने करण्यात आले.माऊली भक्त बापूसाहेब पटारे यांनी भाविकांच्या वतीने मनोगत व्यक्त करून ज्ञानेश्वरी हस्तलिखित केली आता संत तुकोबारायांची गाथा देखील हस्तलिखित व्हावी असाच कार्यक्रम त्यासाठी राबवावा अशी सूचना केली या सुचनेला उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

ज्ञानेश्वरी

यावेळी बोलताना गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज म्हणाले की संत वाड्मय हे श्रद्धेने कळते म्हणून हस्तलिखित ज्ञानेश्वरीने अध्यात्माची खाण आपल्या जीवनात प्राप्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले जीवन जगत असतांना विरोध हा तत्वासाठीच ठेवा,ध्यान, अभिषेक  पारायणे  ही जीवनात करायचीच आहे मात्र संकटात सापडलेल्यांना मदत करणे हाच करा माउलींना अभिषेक ठरेल,ज्ञानेश्वरी लिखानाने जीवनात बदलच होईल असा संदेश देतांना मालक म्हणून नव्हे तर सेवक म्हणूनच समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
         हभप उद्धवजी महाराज मंडलिक म्हणाले की संत विचाराचा आपण जेव्हा अभ्यास करतो,उपासना करतो तेव्हा संतांबरोबर आपण असल्याचा भास होतो,मराठी भाषा व संस्कृती टिकविण्याचे कार्य संतांचे विचारामुळे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.ज्ञानेश्वरी ही मनुष्य जीवाला प्रेरणादायी व प्रेरणा देणारी असून ज्या हाताने ज्ञानेश्वरी हस्तलिखित केली त्या हाताने वाईट कर्म घडू देऊ नका,परमार्थात राहून इंद्रियांची शोभा वाढवा,अंतःकरणात भाव व श्रध्दा ठेवा असे आवाहन हभप मिराताई मिरीकर यांनी यावेळी बोलतांना केले.

यावेळी बोलतांना माजी आमदार नरेंद्र घुले पाटील ३७५ व्या वैकुंठगमन निमित्ताने गाथा ग्रंथ लिहिण्याची संकल्पना माऊली भक्ताने बोलावून दाखवली त्यानुसार गाथा लिहिण्यासाठी लागणाऱ्या वहयांचा खर्च आम्ही देऊ अशी ग्वाही  यावेळी बोलताना दिली

   यावेळी झालेल्या हस्तलिखित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूजन कार्यक्रम प्रसंगी बालसंन्याशी विश्वनाथगिरी महाराज, हभप अंजाबापू कर्डीले,संजय महाराज सरोदे,देविदास महाराज,ज्ञानेश्वर माऊली शिंदे, रामनाथ महाराज पवार, ज्ञानेश्वर महाराज हजारे,राम महाराज बोचरे, कृष्णा महाराज हारदे,ज्योतिषशास्त्र तज्ञ बाळकृष्ण महाराज कुलकर्णी, कोंडीराम महाराज पेचे,अशोक महाराज पांडव,नारायण महाराज ससे,अतुल महाराज आदमने,  त्रिमूर्तीचे मेजर साहेबराव घाडगे पाटील,अलअमीन उर्दू हायस्कूलचे संस्थापक महंमदभाई आतार,काकासाहेब शिंदे,दिलीप मोटे यांच्यासह संत मंडळीसह माऊली भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.विश्वस्त कैलास जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ज्ञानेश्वरी
error: Content is protected !!