ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

खेडलेकाजळी

नेवासा – तब्बल ३५ वर्षानंतर प्रतीक्षेच्या पाठपुराव्यानंतर नेवासे तालुक्यातील खेडलेकाजळी ते गोगलगाव हा जुना शिवरस्ता पुन्हा तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांच्या प्रमुख उपस्थितीत खुला करण्यात आल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. सदरचा शिवरस्ता गेल्या ३५ वर्षांपासून बंद अवस्थेत होता परंतु महसूल विभागाने शेवटी या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार व केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांनी आपल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या समवेत नकाशानुसार या रस्त्याची मोजणी केली व हा रस्ता पादचाऱ्यांसाठी खुला करून देण्यात आला.

सदरचा शिवरस्ता खुला केल्याने खेडले काजळी ते गोगलगाव अंतर कमी होऊन या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांच्या वेळ आणि पैशाची ही बचत होणार आहे.जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या आदेशानुसार व नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरस्ता खुला करण्याच्या वेळी नेवासेचे तहसीलदार डॉ.संजय बिरादार समवेत मंडलाधिकारी बाळासाहेब कुसमुडे, मंडलाधिकारी अशोक गाडेकर या भागातील स्थानिक शेतकरी भाऊसाहेब तांबे, श्रीधर पाठक, लोकसेवक संतोष कोरडे, ज्ञानेश्वर ढगे, पुंजाहारी ढगे, अनिल कोरडे, किरण चव्हाण,भेडू ढगे उपस्थित होते.

शिवरस्ता खुला करून दिल्या बद्दल सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे शेतकरी संतोष कोरडे यांनी आभार मानले तर यामध्ये मंडलाधिकारी अशोक गाडेकर यांनी शिवरस्ता होण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून शिवरस्ता खुला होण्यासाठी विशेष योगदान दिले.त्याबद्दल गावकरी व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देण्यात आले.

खेडलेकाजळी
खेडलेकाजळी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खेडलेकाजळी
खेडलेकाजळी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खेडलेकाजळी
error: Content is protected !!