ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ट्रॅव्हल

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई शिवारात ट्रॅव्हल व ट्रेलरची धडक झाली. सुदैवाने यात कुठलीही जिवित हानी नाही. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. ११ जुन रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास शिंगवे तुकाई शिवारातील पारस कंपनी समोर ट्रॅव्हल बस क्रमांक एम एच २३ ए यु ५५०० व ट्रेलर क्रंमाक एम एच ४० बि जि २८०१ असलेले ही दोन्ही वाहने संभाजी नगर मार्गे नगर कडे जात असताना बस चालकाने रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करीत आपल्या समोरच नगर कडे जाणाऱ्या ट्रेलरला मागील बाजूस जोराची धडक दिल्याने दोन ही वाहनांचे मोठे नुकसान झाले .

त्याचप्रमाणे स्वत: च्या व प्रवाशांच्या कमी अधिक दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी फिर्यादी परसराम तुकाराम डोळे वय ३६ रा. पांगरा डोके ता. लोणार जि. बुलढाणा यांनी बस चालक खंडुराम कैलास दौड वय ४८ रा. सिल्क काॅलनी रेल्वे स्टेशन जवळ छत्रपती संभाजी नगर याचे विरुद्ध गुन्हा र नं. २५५/२०२४भा द.वि.कलम २७९,३३७,३३८,४२७ सह मो. वा. कायदा १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो. हे काॅ. ए एच तमनर हे करत आहेत.

ट्रॅव्हल
ट्रॅव्हल

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ट्रॅव्हल
ट्रॅव्हल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ट्रॅव्हल
error: Content is protected !!